नाशिक

पारोळा महामार्गावर अपघात; दोन ठार, एक गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

पारोळा ः येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू (ता. एरंडोल) येथील पिक अप जीपने धडक दिल्याने त्यात दोन ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतुक जाम झाली होती. 

मिळालेल्या माहितीनूसार, महिला मीराबाई राजेंद्र महाजन हे आपले पती राजेंद्र धर्मा महाजन व तामसवाडी येथील कारागीर विजय नान्हू बेलदार हे पारोळा येथे दातांच्या उपचारासाठी मोटरसायकल (क्रमांक एमएच 19 डब्लू 9646) ने पारोळा कडे जात होते. यावेळी समोरून येणारी पिकअप जीप क्रमांक एमएच 19 बी.एम. 3327 ने ओव्हरटेकच्या नादात मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात राजेंद्र धर्मा महाजन व विजय बेलदार हे जागीच ठार झाले. तर मीराबाई यांना पायास व डोक्‍यास जबर मार लागल्याने त्यांना पारोळा येथे डॉ. योगेश साळुंखे यांनी प्राथमिक उपचार केले त्यांना जबर मार लागल्याने रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी त्यांना धुळे येथे हलविले. 

14-1 
दातांचा उपचाराठी जातांना काळाचा घाला 
महाजन कुटुंब हे विजय बेलदार यांचेसह मोटरसायकल वर ट्रिपल सीट बसून पारोळा येथे दाताच्या उपचारासाठी जात होते. सत्यानारायनण मंदिरासमोर त्यांच्या मोटरसायकल ला पिक अप ने जोरदार धडक दिल्याने यात दोन्ही पुरुषांचा मृत्यू होवून महिला गंभीर जखमी झाली. 
अपघात घडल्या नंतर आजू बाजूच्या शेतातील शेतकरी, वाहन चालक यांनी धाव घेत पोलिसांना माहिती देत मयताना बाहेर काढले यावेळी दोन्ही मयत हे पिक अपच्या मधोमध अडकल्याने ग्रामस्थांनी पिक अपला उलटी करून त्यांना बाहेर काढले तर गंभीर जखमी मीराबाईला त्वरित दुसऱ्या वाहनाने रुग्णालयात हलविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT