sinner-shirdi highway accident esakal
नाशिक

तिघांवर काळाचा घाला; सिन्नर-शिर्डी रस्त्यावर भीषण अपघात

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि.नाशिक) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर (sinner-shirdi highway) कार व डंपरच्या धडकेत कारमधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास दातली (ता. सिन्नर) एमआयडीसी परिसरात घडली. (accident-sinner-shirdi-highway-marathi-news)

एकाच गावातून तिघांची अंत्ययात्रा; सिन्नर-शिर्डी रस्त्यावर काळाचा घाला

सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या हायवा डंपरने (एमएच-१७-बीडी-७५५५) शिर्डीहून सिन्नरकडे येणाऱ्या इंडिगो कारला (एमएच-१२-सीके-९०३०) समोरासमोर धडक दिली. या अपघातात इंडिगो कारचालक रवींद्र गंगाधर रावळ (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव), भागेश अनंत जोशी (५०, रा. कोळपेवाडी) व लीलावती अनंत जोशी (७५, रा. कोळपेवाडी, कोपरगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गरुड तपास करीत आहे. मृत कारचालक व प्रवासी कोपरगाव तालुक्यातील रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT