Chagan Bhujbal esakal
नाशिक

Nashik News | अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल मालकावर करावी कारवाई : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नाशिक येथीस खासगी ट्रॅव्हल बसगाडी अपघातात १२ प्रवाश्यांना जीव गमवावा लागला. तसेच ४१ प्रवासी जखमी झाले. या घटनेची सखोल चौकशी करून ३० प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना ५२ प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

अपघातात मृत व जखमी व्यक्तींना सरकारने जाहीर केलीली मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे केली. (Accidental Private travelAction to be taken against owner Chhagan Bhujbal nashik news)

श्री. भुजबळ म्हणाले, की ८ ऑक्टोंबर २०२२ ला नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल बसगाडी व आयशर ट्रक यांच्यात अपघात होवून खासगी ट्रॅव्हल बसगाडी पेटली. त्यात प्रवाश्‍यांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची चौकशी करून अपघाताची कारणे निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

मृतांच्या वारसांना व जखमींना अद्यापपर्यंत सरकारची मदत मिळालेली नसल्याची तक्रार आहे. घटनेची सखोल चौकशी करून अपघात होऊ नये म्हणून सरकारने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शिवाय केवळ चालकावर कारवाई न करता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलस धारकावर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

नाशिक-मुंबई महामार्गावर ठाणे ते पडघा दरम्यान, कंटेनरमुळे मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने मुंबई-नाशिक प्रवासात ५ तासाहून अधिक वेळ लागत आहे. त्यासाठी तेथे पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन व्हावे. त्याचबरोबर नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवावी, याकडे श्री. भुजबळ यांनी लक्ष वेधले.

चौकशीनंतर मालकावर कारवाई

मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक चौकशी करून दोषी आढळल्यास खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. मृत व जखमी व्यक्तींना सरकारने जाहीर केलेली मदत देण्यात आली आहे. मात्र अद्याप मिळालेली नसल्यास तातडीने वितरीत करण्यात येईल. नाशिक-मुंबई व नाशिक पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीमध्ये शिस्तबध्दपणा आणण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवून पोलीस ‘पेट्रोलिंग' आणि योग्य ती उपाययोजना केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT