Highway esakal
नाशिक

नाशिक : रस्ते सुधारले अपघात वधारले!

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि. नाशिक) : पुणे (Pune), मुंबई (Mumbai), शिर्डी (Shirdi) आणि नगर (Nagar) शहराला जोडणारे प्रमुख महामार्ग सिन्नर तालुक्यातून जातात. या मार्गांवरील वाहतूक आणि तिचा वेग सातत्याने वाढत चालला असून अपघातांचीही (Accident) संख्याही वाढली आहे. वेगाच्या नादात २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात येथे जवळपास रोज अपघात झाले आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे (Corona) अपघातांची संख्या कमी झाली होती नंतर मात्र २०२१ मध्ये ती पुन्हा वाढली आहे. सिन्नर व मुसळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये ८८ अपघातात ८५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ५६ अपघातात ६० जण गंभीररीत्या जखमी झाले.

इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रत्येकाला घाई झालेली असते, मात्र हीच घाई आपल्या जवळच्याच जिवावर बेतेल याची मात्र कुणीही पर्वा करत नाही यातूनच अपघात होत असतात. सिन्नर परिसरात सध्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यापर्यंत आले आहे. शहरालगत जाणा-या नाशिक पुणे, घोटी सिन्नर व सिन्नर शिर्डी हे प्रमुख महामार्ग आहेत. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मुसळगाव फाटा, गुरेवाडी फाटा व मोहदरी घाट हे अपघाताचे प्रमुख ब्लॅक स्पॉट आहेत. बाह्यवळण रस्ताही हळूहळू मृत्युचा सापळा बनू पाहतोय. याला कारण वेगावर नियंत्रण नसणे आहे.

ग्रामीण भागातील ७३ रस्ते खराब

सिन्नर नाशिक चार पदरी रस्ता असल्याने येणारी वाहने शंभरीच्या पुढच्या वेगाने येतात व जातातही, त्यामुळे शहरालगत असणा-या बाह्यवळण रस्त्यावर अनेक अपघात हे वेगावर नियंत्रण नसल्याने झालेले आहेत. तालुक्यातील अंतर्गत रस्तेही पाहिजे तसे चांगले नाहीत. अनेकवेळा दुचाकींचे अपघात या ग्रामीण रस्त्यांवरही होतात. इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गापैकी सुमारे ७३ रस्ते हे खराब आहेत. सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारित येणारे ८ ते १० रस्ते हे खराब आहेत. मृत्युचे सापळे झालेल्या या रस्त्यांची दुरुस्ती अथवा निदान डागडुजी झाली पाहिजे अशा जनतेची मागणी आहे.

''समृध्दी महामार्गाच्या कामामुळे पश्चिम भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी त्यांना आमच्या विभागाकडून दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे.'' - प्रवीण भोसले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिन्नर

''नाशिक पुणे महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत, भरपूर प्रमाणात टोल आकारला जातो पण त्यामानाने सुविधा नाहीत. अंडरपास रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तिथे पाण्याचे आऊटलेट नसल्याने पाणी साचते. दिवे नाहीत, त्यामुळे अपघात होतात.'' - नामदेव कोतवाल, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT