e waste  esakal
नाशिक

ई - कचऱ्याच्या रूपाने नाशिककरांसमोर मोठे संकट

ई - कचऱ्याच्या रूपाने नाशिककरांसमोर एक मोठे संकट उभे ठाकले आहे.

योगेश मोरे

नाशिक : ई - कचऱ्याच्या रूपाने नाशिककरांसमोर एक मोठे संकट उभे ठाकले आहे. परंतु, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना तर गांभीर्य नाहीच, याशिवाय प्रशासनदेखील कुठलीही पावले उचलताना दिसत नाहीत. ई- कचऱ्याची नियमितपणे आणि योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्याने हे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. ई- कचऱ्याचे संकट टाळायचे असेल तर ‘रिसायकलिंग’ हाच त्यावर रामबाण उपाय आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर दिवसागणिक वाढला आहे. कोरोनाकाळात त्यात आणखीच भर पडली. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन स्कूलमुळे अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि साध्या कंपनीपासून ते मल्टनॅशनल कंपनीपर्यंत सर्वांनाच मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपचा वापर करावा लागला. परिणामी, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टॅब, हेडफोन, चार्जर आदी वस्तूंच्या खरेदीत मोठी उलाढाल झाली. थोडासाही अडथळा आला तरी तत्काळ नवीन वस्तू घेण्याला प्राधान्य दिले गेले. त्यामुळे खराब झालेल्या वा बंद अवस्थेत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच ई -कचरा. आज प्रत्येक घरातील अडगळीची जागा ई- कचऱ्याने व्यापली आहे. घरात, कार्यालयात खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अडगळीत पडून राहतात किंवा भंगार गोळा करणाऱ्यास दिल्या जातात. परंतु, हा भंगार गोळा करणारा त्यांची योग्य विल्हेवाट लावतो की नाही, हे तपासले जात नाही. ई- कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत रिसायकलिंग होणे गरजेचे असून यामुळे मोठा धोका टळू शकतो, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये कंपनी सुरू

नाशिक शहराच्या नजीक एका मोठ्या कंपनीचे युनिट सुरू झाले असून, या ठिकाणी ई- कचऱ्याचे योग्यप्रकारे रिसायकलिंग केले जाते. या कंपनीत कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने तयार मशिनरी आहेत. मनपा प्रशासनाने या कंपनीकडून ई- कचऱ्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य मिळवीत नाशिककरांपुढे उभा ठाकलेल्या या धोक्यास टाळणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT