Domestic Violence esakal
नाशिक

Nashik Crime: पत्नीवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीला 7 वर्षांची शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ठार मारण्याच्या उद्देशाने वस्ताऱ्याने गळ्यावर वार करून जखमी केले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ठार मारण्याच्या उद्देशाने वस्ताऱ्याने गळ्यावर वार करून जखमी केले होते.

याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी पतीला सात वर्षे सश्रम कारावास व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Accused gets 7 years sentence in case of assault on wife Nashik Crime)

दीपक वसंत पवार (३२, रा. समर्थनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दीपक हा पत्नीसमवेत पंचवटीतील समर्थनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा.

३० जुलै २०२० रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्याने त्याच कारणातून वाद झाला आणि त्याने पत्नीच्या गळ्यावर वस्तार्याने वार करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एन.व्ही. निवणे यांच्यासमोर चालला.

यावेळी सरकार पक्षातर्फे ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी पंच, साक्षीदार तपासले. त्यात आरोपी दोषी सिद्ध झाल्याने न्या. निवणे यांनी आरोपी पवार यास ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.एम. पिंगळे, सहायक उपनिरीक्षक के.के. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT