crime esakal
नाशिक

Nashik Crime News : प्रेयसी खूनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

परप्रांतीय प्रेयसीसमवेत सिन्नरमध्ये राहताना तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : परप्रांतीय प्रेयसीसमवेत सिन्नरमध्ये राहताना तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

२०१९ मध्ये ही घटना सिन्नर शहरात घडली होती. (Accused in girlfriend murder case sentenced to life imprisonment nashik crime news)

दरवेश गेंदालाल चौरे (४०, मूळ रा. भोपाळ) असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, रेखा मेहरा (रा.भोपाळ) हिच्याशी आरोपी दरवेशचे प्रेमसंबंध होते. रेखा विवाहित व तिला एक मुलगी होती. दोघींना घेऊन तो सिन्नरमध्ये राहण्यास आला होता. संजीवनी नगरमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहत होते.

मात्र दरवेश हा रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. २१ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपी दरवेशने रेखाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुलगी रिया शाळेतून घरी आली असता तिने आईचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही.

त्यामुळे पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला असता, रेखा बाथरूममध्ये मृत आढळली होती. याप्रकरणी सिन्नर पोलिसांत दरवेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एस.पी. पाटील, उपनिरीक्षक सुदाम एखंडे यांनी करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शिरिष कडवे यांनी १८ साक्षीदार तपासले. दोष सिद्ध झाल्याने न्या. जगमलानी यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT