attack esakal
नाशिक

पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस शिक्षा

कुणाल संत

नाशिक : आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून त्याच्यावर चॉपरने हल्ला करत जखमी करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद निवृत्ती आगळे (४०, रा. आगळे चाळ, पंचवटी), असे या आरोपीचे नाव आहे.

२८ नोव्हेंबर २०१८ रोजी पंचवटी परिसरात असलेल्या मनपा शाळा क्रमांक १० येथे पोलिस नाईक माधव सांगळे आणि त्यांच्यासोबत असलेले पोलिस कर्मचारी श्री. आहेर हे कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. येथे असलेल्या आरोपी विनोद आगळे याने पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यानंतर त्याने आपल्याजवळील चॉपर काढत माधव सांगळे यांच्यावर हातावर वार करत त्यांना जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनोद आगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश आर. आर. राठी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. फिर्यादी, पंच, साक्षीदार यांची दिलेली साक्ष, तपास अधिकारी यांना सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने विनोद आगळे यास ३ महिने सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे वकील योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT