नाशिक

आचार्य आर्यनंदी महाराज स्वाध्याय भवन, पाठशाळेचे नामकरण

CD
NSK26H34842 जळगाव : आचार्य आर्यनंदी महाराज स्वाध्याय भवन, पाठशाळेचे नामकरण नुकतेच करण्यात आले.. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर. ------- स्वाध्याय भवन, पाठशाळेचे नामकरण उपशीर्षक आचार्य आर्यनंदी महाराजांचे नाव; स्वाध्यायाच्या प्रसारासाठी उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहाला तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य श्री १०८ आर्यनंदी महाराज यांचे नाव देण्यात आले. यापुढे हे सभागृह ‘आचार्य श्री १०८ आर्यनंदी महाराज स्वाध्याय भवन व पाठशाळा’ या नावाने ओळखले जाणार आहे. या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जळगावचे नामांकित उद्योजक डॉ. विलास जैन सहपरिवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेमिचंद जैन होते. श्री दिगंबर जैन मंडळ संचलित श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहाला आचार्यश्रींचे नाव देण्याचा हा उपक्रम धार्मिक अध्ययन, स्वाध्याय आणि जैन संस्कारांच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. याप्रसंगी श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष आशिष छाबडा, ज्येष्ठ सदस्य जैनेंद्र घोडके, सचिव चंद्रकांत जैन तसेच तरुण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश डेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रेवती चतुर आणि कोमल जैन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. चंद्रशेखर चतुर, महेश जैन, मंगेश कुटे, शशिकांत घोडके, राजेंद्र सैतवाल आणि पुजारी संतोष नडसकर यांनी परिश्रम घेतले. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापर्यंतचा प्रवास होणार हायस्पीड! इलेव्हेडेट मार्गाचे ६७ टक्के काम पूर्ण

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT