without mask.jpg 
नाशिक

हलगर्जीपणा भोवतोय! मास्क न घालणाऱ्या ११४ नागरिकांवर कारवाई

विक्रांत मते

नाशिक : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीतही मास्क परिधान न करणाऱ्या तब्बल ११४ नागरिकांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाईतून साडे सतरा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. सोळा प्रकारच्या कारवाईतून एक लाख ४५ हजार रुपये दंड वसुली झाली.

पश्‍चिम विभागात सर्वाधिक कारवाई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बाजारपेठेत वावरतांना नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय सहा भरारी पथकांची नियुक्ती केली होती. गेल्या आठ दिवसात नाशिकरोड विभागात २५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून चार हजार ८०० रुपये दंड वसुली करण्यात आली. सिडकोत २७ नागरिकांवर कारवाई करताना ५४०० रुपये दंड वसुल झाला. सातपूर विभागात दोन जणांकडून चारशे रुपये तर पश्‍चिम विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. ५९ नागरिकांकडून अकरा हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला. पुर्व विभागात एका नागरिकावर कारवाई करण्यात आली. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांना दंड

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या चौघांवर कारवाई करताना सात हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. रस्त्यावर घाण टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला. पूर्व विभागात उघड्यावर लघवी करणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड तर गोदावरी अस्वच्छता करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पश्‍चिम विभागात दोन तर पुर्व विभागात एकावर कारवाई करण्यात आली. तिघांकडून पाच हजार ४०० दंड वसुल करण्यात आला.

प्लॅस्टीक वापरावर बंदी

प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्या सिडको व पुर्व विभागातील प्रत्येकी एकावर दंडात्मक कारवाई करताना दहा हजार रुपये दर सातपूर विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. पश्‍चिम विभागात पाच जणांकडून पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. पंचवटीत एकावर कारवाई करण्यात आली. पाळीव श्‍वानांना रस्त्यावर सोडल्यानंतर घाण केल्याने श्‍वानांच्या मालकांना दंड करण्यात आला.

मोकळ्या भुखंडावर कचरा

मोकळ्या भुखंडावर कचरा टाकण्यास बंदी असतानाही आठ दिवसात दहा जणांवर कारवाई करण्यात आली. नाशिकरोड, सातपूर व पंचवटी विभागात एक, सिडकोत पाच तर पुर्व विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ हजार २४० रुपये दंड वसुली करण्यात आली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT