Power Theft
Power Theft esakal
नाशिक

नाशिक : वीजचोरी प्रकरणी 261 जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वीजचोरी व अनधिकृत वापराविरुद्ध महावितरण कंपनीने बुधवारी (ता. ८) एकाच दिवशी राबविलेल्या मोहिमेत २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करीत २६१ जणांवर कारवाई केली.

वीज हानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड यांच्यासह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्रांनी राबविलेल्या मोहिमेत वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. नाशिक शहर १ मध्ये ६, नाशिक शहर २ मध्ये ६२, नाशिक ग्रामीणमध्ये ९८, चांदवडमध्ये ७० जणांवर कारवाई केली. तर, विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसऱ्या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. त्यात, नाशिक शहर १ मध्ये ५, नाशिक शहर २ मध्ये ८, नाशिक ग्रामीणमध्ये ७, चांदवडमध्ये ५ जणांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार २६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक मंडळातील २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT