wedding  esakal
नाशिक

वऱ्हाडी मंडळींना लग्न पडले महागात! 5 हजारांचा बसला फटका

युनूस शेख

नाशिक : वेळ दुपारची...लग्न लागले..ते पण मोजक्या वऱ्हाड मंडळींच्या उपस्थितीत...तरीदेखील या सर्वांना हे लग्न महागात पडले असून चक्क ५ हजारांचा फटका बसला आहे. काय घडले नेमके? वाचा....(action-against-break-rules-corona-in-wedding-nashik-marathi-news)

महापालिका पथकाने अचानक दिली भेट.....

महापालिका पश्चिम विभागीय कार्यालयाच्या पथकाने विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यासह विवाह सोहळे असलेल्या दोन मंगल कार्यालयांना अचानक भेट देत पाहणी केली. गंगापूर रोड येथील प्रसाद मंगल कार्यालय आणि समर्थ मंगल कार्यालयास गुरुवारी (ता. १७) दुपारी भेट देत पाहणी केली. त्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळींची संख्या जरी ठरवून दिलेल्याप्रमाणेच होती तरीदेखील सोहळ्याच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. बहुतांशी वऱ्हाडी मंडळींनी मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आले. विनामास्क सोहळ्यात उपस्थित राहून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने दोन्ही मंगल कार्यालयांतील प्रत्येकी पाच अशा दहा जणांवर प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे पाच हजारांचा दंड करण्यात आला. वऱ्हाडी मंडळी विनामास्क असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT