Officers and staff of Crime Investigation Team during action on unauthorized firecracker stalls in Bhadrakali market area. 
नाशिक

Nashik Crime News: अनधिकृत फटाका स्टॉलवर भद्रकाली पोलिसांकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली पोलिसांकडून अनधिकृत तीन छोट्या फटाका स्टॉलवर कारवाई करण्यात आली. काही हजारांचा फटाक्यांचा साठा दुकानातून जप्त करण्यात आला. भद्रकाली मार्केट येथील दुकानदारांनी कारवाईस विरोध केला.

काही वेळ तणाव निर्माण झाला होता. (Action by Bhadrakali police on unauthorized firecracker stall Nashik Crime News)

अनधिकृत फटाका स्टॉलवर कारवाई घेऊन उशिरा का होईना पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये आले. नाशिक रोड येथे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर शुक्रवारी (ता. १०) भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून भद्रकाली मार्केट आणि सरस्वती नाला परिसर अशा ठिकाणच्या अनधिकृत स्टॉलवर कारवाई केली.

कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता स्फोटक, ज्वलनशील फटाक्यांचे दुकाने रस्त्यावर लावण्यात आले होते.

पोलिसांच्या तपासणी दरम्यान तीनही स्टॉल आढळून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकासह गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनधिकृत स्टॉलवर कारवाई करून हजारो रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त केला.

भद्रकाली मार्केट येथील अनधिकृत स्टॉलधारकांनी कारवाई करण्यास विरोध केला. त्यामुळे काहीसा वाद निर्माण होऊन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिसरातील नागरिकांनी मात्र गर्दीच्या ठिकाणी केलेल्या कारवाईचे समर्थन केले. अशा प्रकारची कारवाई यापूर्वीच होणे अपेक्षित होती. तरी काही हरकत नाही. ‘देर आये दुरुस्त आये’, असे म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT