tobacco ban esakal
नाशिक

शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे (tobacco and tobacco products) सेवन टाळण्यासाठी केंद्र शासनाने तंबाखूमुक्त शाळा धोरण (Tobacco free school policy) तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी महापालिका (NMC) तसेच शहरातील खासगी शाळांमध्ये होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Education Department) सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर दर सामान्यांनी शाळांनी स्वयं मूल्यांकन करून ९० गुण मिळणाऱ्या शाळा तंबाखूमुक्त जाहीर केल्या जाणार आहे. (Action if tobacco products are found in premises of educational institutions Nashik News)

विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढून तंबाखूमुक्त वातावरण करण्यासाठी केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक धोरण जाहीर करताना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यात महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या शंभर याड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दंडात्मक कारवाईची अधिकार संस्थांना दिले आहे. शाळांच्या परिसरामध्ये धूम्रपानास बंदी घालण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनापासून दूर राहण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनी धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिका शिक्षण प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT