Police officers, staff while taking action against detained alcoholics esakal
नाशिक

Nashik Crime: तळीरामांविरुद्ध पोलिसांचे कारवाईचे हत्यार; पोलिस ठाण्यास आले मधुशालेचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पोलिसांनी तळीरामांविरुद्ध कारवाईची हत्यार उपसले आहे. मंगळवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास विविध भागात मद्याच्या पार्ट्या करत परिसरात अशांतता पसरविणाऱ्या मद्यपींची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

त्यामुळे पोलिस ठाण्यास मधुशालेचे स्वरूप आले होते. (action of police against drunkards Nashik Crime)

म्हसरूळ येथे माजी सैनिकाचा खून झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. खून करणारे संशयित मद्य सेवन केलेले होते. त्यातून त्यांनी वाद घालत खून केल्याचे स्पष्ट झाले.

इतरही वेळेस मद्यपींकडून चौकात रस्त्यात मोकळ्या मैदानात कुठल्याही भागात मद्याचे सेवन करून धिंगाणा घातला जातो. परिसरात दहशत पसरवून नागरिकांना मारहाण करण्याचे प्रकार करत असतात.

म्हसरूळ येथील खून त्यातीलच एक घटना आहे. अशा मद्यपींवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिस विभागाकडून करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तातडीची बैठक घेऊन मद्यपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवारी रात्री लगेचच पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भद्रकाली पोलिसांकडून पोलिस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी गस्त करून मद्यपींना ताब्यात घेतले.

बराच वेळ त्यांना पोलिस ठाण्यात बसवून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय अशा प्रकारचे वर्तन यापुढे होता कामा नये, या संदर्भात समज देण्यात आली.

मद्यपींची संख्या अधिक असल्याने भद्रकाली पोलिस ठाणे आवारास मधुशालेचे स्वरूप आले होते. मद्यपी यांच्या कुटुंबीयांनीही पोलिस ठाणे आवारात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT