police esakal
नाशिक

कोबिंग ऑपरेशनमध्ये 85 टवाळखोरांवर कारवाई

नरेश हाळणोर

नाशिक : शहरभर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत ८५ टवाळखोरांवर कारवाई केली असून, यात परिमंडळ एकमध्ये २८, तर परिमंडळ दोनमध्ये ५७ टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (Action on 85 robbers in combing operation Nashik news)

परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे व परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन मोहीम सुरू आहे. शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्री केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, उशिरापर्यंत सुरू आस्थापना, तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथके नेमून कारवाई केली गेली. यात सर्वाधिक ८५ टवाळखोरांविरोधात कारवाई केली. सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३४ टवाळखोरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, परिमंडळ एकमध्ये १२ आस्थापना या निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने त्यांच्यावरही कारवाई केली. यामध्ये सरकारवाडा व मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक- एक तर, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० आस्थापनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT