Traffic Police esakal
नाशिक

Nashik News : ट्रीपल सिट, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दणका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांविरुद्ध नाकाबंदी करून २७६ चालकांवर कारवाई केली. (Action taken against 276 drivers against triple seat and helmetless two wheeler drivers nashik news)

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी पालन करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून केले जाते. तरीही वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वाहतूक खोळंबा, अपघाताच्या समस्या उद्‌भवतात. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी (ता. १४) सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत विशेष मोहीम राबविली.

त्यात १५ पोलिस अधिकारी व ६८ कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी होता. या ताफ्याने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून ६०३ वाहने तपासली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १२० वाहनचालकांवर तर उपनगर, सातपूर, अंबड, देवळाली कॅम्प, नाशिक रोड व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या चालकांकडून १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. ट्रिपल सीट व विनाहेल्मेट चालकांवर ही कारवाई करण्यात आली. यापुढेही बेशिस्त चालकांवर नियमीत कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT