Corona Updates News Nashik esakal
नाशिक

Corona Update : ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण 450 प्लस; 100 पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात दैनंदिन कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या तीन आकडी राहत आहे. मंगळवारी (ता. १२) जिल्ह्यात शंभर रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले आहेत. ५६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ४४ ने वाढ झालेली आहे. सक्रिय बाधितांची संख्या साडेपाचशे पार झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ५५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Active Patient 450 Plus 100 Positive Nashik Corona update Latest Marathi News)

मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ५४, नाशिक ग्रामीण भागात ३८, मालेगाव महापालिका क्षेत्रात सहा रुग्‍णांना कोरोना लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. तर, जिल्‍हाबाहेरील दोघांना कोरोना लागण झाली आहे.

सध्या ५५७ बाधितांवर उपचार सुरू असून, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील २८७, नाशिक शहरातील दोनशे, मालेगावचे ४२, जिल्‍हा बाहेरील २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ८६८ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ७५६, नाशिक शहरातील ११२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

मंगळवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर ५. १८ टक्‍के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्‍हीटी दर दहा टक्क्यांहून अधिक झाला असून, १०. २५ टक्‍के अशी नोंद झालेली आहे.

सध्याच्‍या सक्रिय रुग्‍णांपैकी अवघ्या आठ बाधितांमध्ये लक्षणे आढळून आलेली असून, त्‍यांच्‍यापैकी एका बाधिताला उपचारात ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT