Sakal - 2021-03-08T085332.154.jpg 
नाशिक

Women Day 2021 : सिनेसिनेसृष्टीतील नायिका सोसतेय हालापेष्टा! १०० चित्रपटांहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीची ही अवस्था

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकातील प्रत्यय नाशिकमध्ये एका ९७ वर्षीय अभिनेत्रीला येत आहे. १९३० ते १९६० दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील १०० चित्रपटांहून अधिक चित्रपटात काम केलेली ही अभिनेत्री सध्या  हालापेष्टा सोसतेय...

१०० चित्रपटांहून अधिक चित्रपटात काम करणारी अभिनेत्री....

दिल्ली, कोलकता व मुंबई असा प्रवास करून चित्रपटात मुख्य नायिका, खलनायिका व विविध पात्र करून नावलौकिक मिळविलेल्या स्मृती विश्वास-नारंग सध्या नाशिक रोड येथील चव्हाण मळ्यात राहतात. त्यांना स्वतःच्या मालकीचे छप्पर नाही. त्या भाड्याच्या घरात राहत असून, मुलगा राजीवबरोबर आर्थिक अडचणी व दारिद्र्य सहन करीत आहेत. १९३० ते १९६० दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील १०० चित्रपटांहून अधिक चित्रपटात काम केलेल्या स्मृती विश्वास- नारंग सध्या कौटुंबिक, सामाजिक व वैद्यकीय समस्येत सापडल्या आहेत. त्यांना गरज आहे, दानशूर हातांची आणि आधाराची.... 

अभिनेत्रीने लढली न्यायालयीन लढाई पण....
हिंदी चित्रपट हमसफर, हमदर्द, बाप रे बाप, भागंभाग, तलवार, अरब का सौदागर, चांदणी चौक, जागते रहो, अपराजिता, अभिमान, नेक दिल अशा शंभरहून अधिक चित्रपटांत नावाजलेल्या भूमिका केलेल्या स्मृती विश्वास नारंग यांची कहाणी चित्रपटातल्या गोष्टीसारखीच आहे. १९८६ ला त्यांचे पती डी. एस. नारंग यांचे निधन झाले. नंतर मुंबईच्या जुहू परिसरात असणारा बंगला एका बिल्डरला पुनर्बांधणीसाठी दिला. या काळात त्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हायला लावले. मात्र, तो बंगला संधिसाधू लोकांनी बळकावून घेतला. दिल्ली, कोलकता व मुंबईतील मालमत्ताही त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लोकांनी लुटली. त्यासाठी न्यायालयीन लढाई या अभिनेत्रीने लढली. मात्र, यश आले नाही. 

वैद्यकीय सेवेचा मोठा गंभीर प्रश्न

देवानंद, राजकपूर, अशोक कुमार, राजकुमार साहेब, प्रेमनाथ, भारत भूषण, किशोर कुमार, गुरुदत्ता जोनिवाकर, नाना भट, व्ही. शांताराम, बी. आर. चोप्रा, संतोषी, विमल रॉय, जॅकी माहेश्वरी, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सलमान खानची आई सलमा खान, अमिताभ बच्चन अशा दिग्गज लोकांबरोबर काम काम केलेल्या स्मृती यांच्या वैद्यकीय व घरगुती खर्चाच्या समस्या भेडसावत आहेत. नातेवाइकांपासूनही दुरावलेल्या स्मृती यांना जवळची मित्रमंडळी थोडाफार आर्थिक हातभार लावतात. मात्र, सध्या त्यांच्या वैद्यकीय सेवेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना दानशूर हातांची गरज आहे. 

‘कुणी घर देता का घर’,
आजपर्यंत २८ घरे बदललेल्या स्मृती विश्वास सध्या येथील चव्हाण मळ्यात राहत असून, अविवाहित मुलांबरोबर त्या हालापेष्टा सहन करीत आहेत. दादासाहेब फाळके, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाशिकनगरीत या अभिनेत्रीने सहारा मिळविला आहे. त्यांना गरज आहे, हक्काच्या निवाऱ्याची व दोन वेळच्या भाकरीची, म्हणून ‘कुणी घर देता का घर’, असेच म्हणण्याची वेळ या अभिनेत्रीवर आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

SCROLL FOR NEXT