adhik maas 2023 importance of karma vrat charity nashik news esakal
नाशिक

Adhik Maas 2023 : उपासनेसह कर्म, व्रत, दानाला महत्त्व! अधिक मासानिमित्त धार्मिक विधींची भाविकांकडून तयारी

सकाळ वृत्तसेवा

Adhik Maas 2023 : यंदाचा अधिक मास हा श्रावणात आला असल्‍याने श्रावण महिनाभर लांबला आहे. सामान्यतः दीपअमावस्‍येनंतर ‘बम..बम..भोलेचा’ गरज केला जात असतो.

यंदा अधिक मासानिमित्त उपासनेसह कर्म, व्रत व दानाला महत्त्व लाभले आहे. भाविकांकडून या अनुषंगाने जय्यत तयारी केल्‍याचे बघायला मिळते आहे.

अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासात श्रद्धा- भक्तियुक्त राहून उपासना, कर्म, व्रत व दान करणाऱ्यांना पुण्य मिळते अशी पुराणांमध्ये आख्यायिका आहे. या महिन्‍यात विष्णू देवतेच्‍या उपासनेला महत्त्व आहे. (adhik maas 2023 importance of karma vrat charity nashik news)

भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप आदींचे आचरण महिनाभर केले जाते. या अनुषंगाने भाविकांकडून तयारी करण्यात आलेली असून, पुढील महिनाभर व त्‍यानंतर लागलीच श्रावण महिनाला सुरवात होणार असल्‍याने पुढील काही दिवसांपर्यंत वातावरण भक्‍तीमय राहणार आहे.

पुढील महिन्‍यात १६ ऑगस्‍टला अधिक मास अमावस्‍या असून, त्‍यानंतर श्रावण महिन्‍याला सुरवात होणार आहे. या वेळीदेखील भक्‍तीमय वातावरणात भाविक भगवान शंकराच्‍या आराधनेत तल्लीन झाल्‍याचे चित्र सर्वदूर बघायला मिळत असते. यंदाही भाविकांनी श्रावण मासाच्‍या स्‍वागताची तयारी केल्‍याचे बघायला मिळते आहे.

बोल भाविकांचे..

"श्रावण महिन्‍यानिमित्त नियमित जप करत असतो. यंदा अधिक मास आल्‍याने आत्तापासून जपाला सुरवात करत असून, जास्‍त दिवस भोलेनाथाची भक्‍ती घडणार असल्‍याचा वेगळाच आनंद होतो आहे." - सागर मराठे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"नुकताच मी मित्रांसोबत केदारनाथ-बद्रिनाथ अशी चारधाम यात्रा करून आलो. या यात्रेतून प्रसन्न वाटत असून, असाच उत्‍साह श्रावणापर्यंत कायम राहणार आहे. भोलेनाथाच्‍या जपातून ऊर्जा मिळेल असा विश्‍वास आहे." - सुनील जाधव

"वर्षभर तसा नित्‍याने जप करत असतो. पुराणांमध्ये अधिक मास, श्रावण महिन्‍यात जप-तपाला विशेष महत्त्व दिलेले आहे. त्‍यामुळे देवदर्शनासह नित्‍याने जाप करताना देवाची आराधना सुरु आहे. यामुळे मनःशांती व चांगले स्‍वास्‍थ लाभत असल्‍याचे समाधान आहे." - सागर धुमणे

"त्र्यंबकेश्‍वर, कपालेश्‍वराच्‍या दर्शनाला नियमित जाणे होते. अधिक मास, श्रावणानिमित्त सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण होत असल्‍याने भक्‍तीसाधनेचा आनंद द्विगुणित होत आहे. त्‍याअनुषंगाने यंदाच्‍या वर्षी उत्‍साहाचे वातावरण आहे." - तुकाराम पिंगळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT