Devotees esakal
नाशिक

Adhik Maas 2023: जप-तप पूजनाने मंदिर, रामतीर्थ गजबजले! भाविकांकडून व्रत, पूजनातून भक्तिभावाने आराधना

सकाळ वृत्तसेवा

Adhik Maas 2023 : अधिक श्रावणाला सुरवात झाल्‍यापासून धार्मिक वातावरण झाल्‍याचे बघायला मिळत आहे. या कालावधीत व्रतवैकल्‍यास महत्त्व मानले जात असल्‍याने भाविकांकडून व्रत, पूजनातून भक्तिभावाने आराधना केली जाते आहे.

दुसरीकडे मंदिर, रामतीर्थ परिसरात भाविकांच्‍या वर्दळीमुळे हे परिसर गजबजले आहेत. (Adhik Maas 2023 temple Ramtirtha buzzing with puja Fasting by devotees worshiping with devotion nashik)

अधिक मास, श्रावणामुळे एकीकडे धार्मिक पर्यटनाला चालना मिळते आहे. दुसरीकडे स्‍थानिक व विविध ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून पूजा विधी, जप-तपाला महत्त्व दिले जाते आहे.

रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि दीपदान करण्यासाठी भाविक आवर्जून हजेरी लावत आहेत. तसेच कौटुंबिक पातळीवर व्रत, पूजनातून सध्या अधिक मासात भगवान विष्णूची आराधना केली जाते आहे.

यंदाच्‍या चतुर्मासातील श्रावण मासाला सुरवात होणार असल्‍याने, यानिमित्त भगवान शंकराची आराधना केली जाणार आहे. श्रावणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सोमेश्‍वर, कपालेश्‍वर प्रशासनाकडून आवश्‍यक ते नियोजन आखले जाते आहे.

भाविकांना दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेक व अन्‍य पूजा विधी करण्यासाठी आवश्‍यक सुविधांचे नियोजन आखले जाते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंदा चार एकादशी व्रत

नियमित मराठी वर्षाच्‍या तुलनेत यंदा अधिक मासामुळे एकादशी व चतुर्थीची एकूण संख्या अधिक राहिली आहे. यामुळे या व्रतांतून भक्तिभाव व्‍यक्‍त करताना मनोभावे प्रार्थना करण्याची संधी भाविकांना मिळालेली आहे.

श्रावणात अधिक मास आल्‍याने यंदा चार एकादशी व्रत आणि दोन संकष्टी चतुर्थी व्रत आहेत. मराठी वर्षात सामान्‍यतः २४ एकादशी येतात, परंतु यंदा अधिक मासामुळे २६ एकादशी व्रत करण्याचे पुण्य भाविकांना मिळणार आहे.

नुकतीच २९ जुलैला कमला एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्‍साह बघायला मिळाला. १२ ऑगस्‍टला दुसरी एकादशी आहे. नीज श्रावणातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी (पुत्रदा एकादशी) येत्‍या २७ ऑगस्‍टला असून, १० सप्‍टेंबरला अजा एकादशी आहे.

तसेच यंदाच्‍या वर्षी १२ ऐवजी १३ संकष्टी चतुर्थी आहेत. अधिक श्रावणात येत्‍या शुक्रवारी (ता. ४) चतुर्थी असून, नीज श्रावणात येणारी संकष्टी चतुर्थी ३ सप्‍टेंबरला आहे. तत्‍पूर्वी २० ऑगस्‍टला विनायक चतुर्थी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT