(पान ३ ला मेन)
MSI26B09690, MSI26B09688
म्हसदी : आदिमाया धनदाईदेवीची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात पुरातन मंदिर.
-----------------------
आदिमाया धनदाईदेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी
गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार
दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ५ : येथील आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिराजवळ नवरात्रोत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आदिमाया धनदाईदेवीचे मंदिर चोवीस तास खुले असणार आहे. मंदिर परिसराची साफसफाई केली जात आहे. मंदिरावर विजेच्या दिव्यांच्या रोषणाई केली जात आहे. यापूर्वीच मंदिरावर रंगरंगोटी करण्यात आली आहे.
-------------
आदिमाया धनदाईदेवीजवळ राज्यभरातील ७७ पेक्षा अधिक कुळाचे भाविक दर्शन, नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात. दहा दिवसीय नवरात्रोत्सवात देवीजवळ भाविक विविध धार्मिक कार्यक्रम करतील. भाविकांना श्री. धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देत सहकार्य केले जाते. भाविकांच्या दृष्टीने चैतन्याचा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सवात मंदिराजवळ भाविकांची दहा दिवस मांदियाळी असणार आहे. नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. डोगंराच्या कुशीत धनदाईदेवीचे पुरातन मंदिर आहे. देवीची स्वंयभू मूर्ती असून, श्रावण महिना, नवरात्रोत्सवासह चैत्र शुद्ध अष्टमीच्या यात्रोत्सवात लाखो भाविक दर्शन, नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात.
------------------
चक्रपूजा व घटस्थापना
कुलदैवत मानणारे बहुतेक भाविक धनदाईदेवीजवळ घटस्थापना, चक्रपूजेला प्राधान्य देतात. यंदा अकरा ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास आरंभ होत आहे. पहिल्या माळेस धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे घटस्थापना केली जाते. मंदिराच्या सभागृहात भाविकांना घट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कुलदैवत मानणारे भाविक देवीजवळ घटस्थापना करत दहा दिवस मुक्कामी असतात. मुक्कामी असणाऱ्या भाविकांसाठी देवीजवळ मोफत निवासाची सोय आहे. शिवाय मंदिरावर मानाचा ध्वज चढवला जातो. मंदिरावर विजेच्या दिव्यांच्या रोषणाई करण्यात येत आहे. पंचमी, सप्तमी, अष्टमी व नवमीला भाविक चक्रपूजा व आरत्या लावण्यास विशेष प्राधान्य देतात. मंदिराच्या पायथ्याशी स्थानिक कायमस्वरूपी व्यावसायिकांची पुजेच्या साहित्याचे दुकाने असून, इतरत्र बाहेर गावाची व्यावसायिक दुकाने लावतात.
------------------
पहाटेच्या काकड आरतीने चैतन्य
नवरात्रोत्सवात पहाटे साडेपाचपासून भाविकांची पाऊले मंदिराकडे वळतात. मंदिराजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पाच वाजून ४५ मिनिटांनी सामूहिक काकड आरती केली जाते. आरतीसाठी स्थानिकासह परिसरातील भाविकांची उपस्थिती असते. मंदिराजवळ नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविक दर्शनासाठी विशेष प्राधान्य देतात. भाविकांना दर्शन सुलभ, जलदगतीने व्हावे, मंदिर व परिसरात गर्दी थोपवून राहू नये म्हणून धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने नियोजन केले आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व स्वयंसेवक लक्ष ठेवून असतात. शिवाय साक्री पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. वीज उपकेंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते. आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, तसेच स्थानिक ठिकाणच्या सर्व शांळाचे विद्यार्थी, गावातील शेकडो युवक स्वयंसेवक म्हणून दहा दिवस सहकार्य करतील. तसेच, गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी देखील सहकार्य करतात.
-----------------
आदिमायेस रोज नवरंगाचा आहेर
कुलदैवत धनदाईदेवीस नवरात्रोत्सवात दररोज नवरंगाचा आहेर,साजशृंगार चढविला जातो. आहेर चढविल्यानंतर सामुदायिक काकड आरती केली जाते. दररोज देवीजवळ अभिषेक केला जातो. पहाटे व सायंकाळी महाआरती केली जात असल्याने भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात दर्शन, नवसपूर्तीसाठी येणारे भाविक देवीला आहेर, साजशृंगार चढवितात. नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर मंदिरालगत मंडप उभारण्यात येणार आहे. भाविकांनी मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव देवरे, उपाध्यक्ष गंगाराम देवरे, खजिनदार सुरेश जैन, सचिव हिम्मतराव देवरे व संचालक मंडळाने केले आहे.
--------
दरवर्षी कुलदैवत, आदिमाया धनदाईदेवीजवळ भाविकांची गर्दी वाढत आहे. भांविकासाठी मंदिराजवळ शुद्ध, थंड मुबलक पाणी उपलब्ध असून सावलीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. शक्य त्या सुविधा देण्यासाठी तरुण ऐक्य मंडळ प्रयत्नशील आहे.
- यशवंतराव बळीराम देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.