Mask free
Mask free sakal
नाशिक

महाराष्ट्राची 'मास्क' बंदी हटवणार का ? आदित्य ठाकरेंचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संदर्भात राज्य शासन जे काही निर्णय घेते जागतिक आरोग्य संघटना व तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने केलेल्या सूचनांनुसार अमलात आणल्या जातात त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात मुक्ती होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. २८) केले.

नाशिकमध्ये विविध विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्ताने श्री. ठाकरे आले होते. गंगापूर धरण येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रेस्ट हाउसवर आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र कोल्हापूर-सोलापूर मास्कमुक्त होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पायाभूत सुविधा पुरविताना किंवा विकासाची कामे करताना शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये याच अनुषंगाने कामे केली जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कन्वेक्शन सेंटरला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळांच्या पाचशे मीटर आवारामध्ये मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. अर्बन प्रोटेक्शननुसार झाडे वाचू याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट क्लायमेट कौन्सिलची स्थापना करण्यात आल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

राज्याच्या हिताचा निर्णय

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला राज्य शासनाने परवानगी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत असताना या विषयावर आदित्य ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महसूल वाढविणे, तसेच राज्याच्या हिताचा निर्णय घेत आहे. त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय टीका केली याला उत्तर देणार नाही, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. राज्य सरकार महसूल वाढविण्यासाठी निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा या राज्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला दोनदा जाण्याची संधी मिळाली. आता निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT