Adivasi Vikas Bhavan news esakal
नाशिक

Adivasi Vikas Bhavan : ‘राजपत्रित’चा पदभार कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकास भवनात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अधिकारावर मर्यादा टाकत काही अधिकाऱ्यांचे पदभार काढून घेतले. प्रकल्प अधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे आदिवासी विकास विभागात या कारवाईची चांगलीच चर्चा झाली. या कारवाईत राजपत्रित अधिकाऱ्याचे पदभार थेट कनिष्ठ कर्मचाऱ्यास देत त्यांच्याकडील पदभार रात्रपत्रित अधिकाऱ्यास देत खच्चीकरण केले आहे. (Adivasi Vikas Bhavan news responsibility shifted of Gazette officer to Junior Staff Nashik Latest Marathi News)

राजपत्रित अधिकाऱ्याचा पदभार हा कनिष्ठ कर्मचारी याकडे देणे हे कितपत योग्य, अशीच चर्चा इतर विभागातील अधिकाऱ्यांमध्ये होती. आदिवासी विकास विभागातच प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयात कार्यरत असलेल्या दोघा राजपत्रित अधिकारी व एका अधिकारी यांचा पदभार आणि अधिकार हे प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत तडकाफडकी काढून घेत ते कनिष्ठ कर्मचाऱ्यासह इतर राजपत्रित अधिकाऱ्यांकडे दिले.

यात विकास विभागाचा कार्यभार हा गृहपालाकडे सोपविण्यात आला आहे. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामावर मर्यादा टाकल्या आहेत. ही कारवाई करताना या अधिकाऱ्यांविरुद्ध कसलीही तक्रार नसल्याची चर्चा विभागात आहे.

यापूर्वीही गंभीर असाच प्रकार

यापूर्वी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकामध्ये आश्रमशाळेमधील विद्याथी, विद्यार्थिनी यांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व आदिवासी विकास विभागाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून कुठल्याही संघटना, संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, त्रयस्थ व्यक्ती यांना थेट प्रवेश देता कामा नये, तसेच पत्रकार यांना वृत्तांकन करण्यापासून मज्जाव करणे असे आदेश सर्व आश्रमशाळा मुख्याध्यापक यांना दिले होते. प्रकल्प अधिकारी यांनी काढलेल्या या निर्णयाची देखील चांगलीच चर्चा विभागात झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: भिवंडी घटनेत जीव वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्यांनी घेतला बळी, ठाण्यात मृत्यू

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Latest Marathi News Live Update : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर आघाडीवर; मध्य प्रदेशातील दतियामध्ये अटीतटीची लढत

Friend Bonding Numerology: 'या' ३ जन्मतारखांचे लोक बनतात बेस्ट फ्रेंड! भांडण झाले तरी तुटत नाही मैत्रीचे नाते...

SCROLL FOR NEXT