national youth festival esakal
नाशिक

National Youth Festival : युवकांच्या कुंभमेळ्यातून नाशिकचे देशभर ‘ब्रँडिंग’; राष्ट्रीय युवा महोत्सवाचे विश्लेषण

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचा अनुभव गाठीशी असलेल्या नाशिकच्या प्रशासनाने राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मिनी कुंभ यशस्वीरीत्या पार केला.

सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचा अनुभव गाठीशी असलेल्या नाशिकच्या प्रशासनाने राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मिनी कुंभ यशस्वीरीत्या पार केला. पाच दिवसांच्या या महोत्सवातून नाशिकचे देशभर ‘ब्रँडिंग’ तर होईलच, याशिवाय नाशिकच्या युवकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यास हा महोत्सव पूरक ठरेल.

महाराष्ट्रात २००७ नंतर आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. (administration of Nashik successfully conducted Mini Kumbh of National Youth Festival nashik news)

२७ व्या महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले. राष्ट्रीय पातळीवर नेत्यांच्या येण्याने ‘नाशिकचे अंगण’ अधिक स्वच्छ व सुंदर झाले. रस्त्यांवरील खड्डे रात्रीतून भरल्या गेले; तर स्वागतासाठी सजलेल्या कमानींसोबत ‘बाभळीच्या झाडांना झेंडूच्या फुलांच्या माळा’ चिकटविण्यात आल्या.

पंचवटीत तर रस्तोरस्ती अशा स्वरूपाचे चित्र दिसून आले. आयोजकांना दोष द्यायचा तर त्यांनाही अवघ्या २० दिवसांत तयारी करण्याचे शिवधनुष्य पेलायचे होते. त्यामुळे त्यांनाही दोष देण्यात अर्थ नव्हता. रस्त्यांवरील दुभाजकांची रंगरंगोटी करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून धुळीवर रंग भरले जात होते. पण, नियोजनासाठी पुरेसा वेळच नसल्याने नाशिककरांनी त्याकडे डोळेझाक केली.

उद्‌घाटन सोहळा व्यवस्थितरीत्या पार पडल्यावर पोलिसांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. आता क्रीडा व युवक कल्याण विभागाला ‘चार’ दिवसांची कसोटी खेळायची होती. त्यासाठी निवडलेली ठिकाणे योग्य असल्याने फार कसरत झाली नाही; पण केंद्र सरकार आणि राज्यातील अधिकारी यांच्यात असमन्वय वेळोवेळी दिसून आला. सादरीकरणासाठी आलेल्या युवकांचा काही अंशी हिरमोड झाला.

परराज्यांतील काही विद्यार्थ्यांची गैरसोयवगळता भोजन, निवास आणि बसची व्यवस्था केंद्र सरकारने निश्चित करून दिलेली असल्याने त्याविषयी स्थानिकांना बोलण्याचा अधिकार उरलाच नाही. राहिली गोष्ट युवा दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कार्थींची, तर त्यांना पंतप्रधानांच्या हस्तेच पुरस्कार हवे होते. पण, मंत्री हेही केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे पुरस्कार्थींचा आग्रह अनाठायी वाटतो.

देशाच्या ३२ राज्यांतून आलेले सात हजार युवक-युवती व त्यांचे प्रतिनिधी यांनी महाराष्ट्राची संस्कृती पाहिली. महोत्सवानिमित्त कुंभनगरीची सकारात्मक भावना घेऊन हे युवक मायदेशी परतणार आहेत. २०२७ च्या कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, असेच यानिमित्त म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT