degree admission  esakal
नाशिक

Engineering Degree Admission : अभियांत्रिकी पदविकेला पसंती! 28 हजार 750 जणांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Engineering Degree Admission : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे. नाशिक विभागातील तंत्रनिकेतनमध्ये २२ हजार जागा उपलब्‍ध असताना प्रत्‍यक्षात प्रवेशासाठी २८ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

नोंदणीसाठी शुक्रवार (ता.७) पर्यंत मुदत दिलेली आहे. (Admission Preference for Engineering Degree Registration of 28 thousand 750 people nashik)

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. नोंदणीची मुदत संपत असतानाच वाढीव मुदत देण्याचा निर्णय डीटीईतर्फे घेण्यात आला होता.

सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.७) पर्यंत संकेतस्‍थळावर नोंदणी करता येणार आहे. याच मुदतीत विद्यार्थ्यांना ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी यापैकी कुठल्‍याही एका पर्यायाची निवड करून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यायची आहे.

१० जुलैला प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित असून, ११ व १२ जुलैदरम्‍यान हरकती, तक्रारी नोंदविण्याची मुदत दिली जाणार आहे.

यानंतर १४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित असून, या यादीच्‍या आधारे पुढील प्रवेश फेऱ्या (कॅप राउंड) पार पडणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्‍हानिहाय नोंदणी झालेली संख्या

जिल्‍हा नोंदणीकृत विद्यार्थी

नाशिक ११ हजार २५०

नगर ८ हजार ६१०

धुळे २ हजार २७०

जळगाव ५ हजार ७८०

नंदुरबार ७८०

"दहावीनंतर तंत्रशिक्षण शाखेतील पदविका हा करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. गेल्‍या काही वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्‍या संख्येत सातत्‍याने वाढ होत असून यावर्षीही नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पदविकेनंतर पदवी शिक्षण किंवा रोजगार, स्‍वयंरोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. विविध समाज घटकातील विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या पात्रतेच्‍या निकषांच्‍या आधारे शिष्यवृत्ती योजना उपलब्‍ध असून, योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा."

- प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT