RTE e sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया खोळंबली

अरुण मलाणी

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची (RTE) प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्‍हास्‍तरावर चार हजार ५४४ पैकी एक हजार ३४५ जागा रिक्‍त आहेत. रिक्‍त जागांचे प्रमाण सुमारे तीस टक्‍के आहे. या जागांवर प्रवेशासाठी अद्याप दिशानिर्देश जारी झालेले नसल्‍याने प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे.

गेल्‍या वर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशप्रक्रिया विलंबाने सुरू आहे. जूनमध्ये शाळांमध्ये अद्ययन प्रक्रिया सुरू झालेली असताना, ‘आरटीई’अंतर्गत उशिराने प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, कोरोना महामारीमुळे ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया उशिराने सुरु झाली असली तरी, ऑनलाइन अर्जाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मात्र, धिम्या गतीने प्रवेशप्रक्रिया सुरू असल्‍याने उशिराने प्रवेशित विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्‍थिती

नाशिक जिल्ह्यात साडेचारशे शाळांमध्ये चार हजार ५४४ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध होत्या. या जागांकरिता १३ हजार ३३० अर्ज आले होते. सोडतीत चार हजार २०८ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली होती. यापैकी तीन हजार १९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. सुरवातीस ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत होती. यानंतर टप्प्‍याटप्प्‍याने मुदतीत वाढ करत ३१ जुलैपर्यंत प्रवेशाची संधी उपलब्‍ध होती. ही मुदत संपून दोन दिवस उलटलेले असताना, अद्यापही रिक्‍त जागांवर प्रवेशासंदर्भात वेळापत्रक जारी केलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : माजी खासदार सुजय विखेंचे बॅनर फाडल्याप्रकरणी फिर्यादी निघाला आरोपी

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT