admission esakal
नाशिक

अभियांत्रिकी शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु

अरुण मलानी

नाशिक : इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राबविल्‍या जाणाऱ्या या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे हा निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांना गुरुवार (ता.७) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. ९ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. गेल्‍या २ जूनपासून ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी उपलब्‍ध करून दिलेली होती. एकीकडे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया खोळंबलेली असताना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून देण्यासाठी डिप्‍लोमा प्रवेश अर्जास मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार गुरुवार (ता.७) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

तसेच याच कालावधीत ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्षात कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेच्‍या पुढील टप्यांत ९ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत हरकती, तक्रारी नोंदविण्यासाठी ९ ते ११ जुलै या कालावधीत संधी उपलब्‍ध करून दिली जाईल. १२ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. यानंतर कॅप राउंडच्‍या प्रक्रियेतून प्रत्‍यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

SCROLL FOR NEXT