नाशिक

राष्ट्रीय महामार्गासाठी मिळणार दोन सुसज्ज रुग्णवाहिका

CD
टुडे १, ॲन्कर ---- राष्ट्रीय महामार्गासाठी मिळणार दोन सुसज्ज रुग्णवाहिका उपशीर्षक ‘गोल्डन अवर’मध्ये उपचारासाठी उपयुक्त; रस्ते सुरक्षा समितीचा पुढाकार सकइाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेत आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दोन आधुनिक ‘लाइफ सपोर्ट’ रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची शिफारस जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव प्रकल्प अंमलबजावणी कार्यक्षेत्रात (PIU) या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. १४-२ ‘गोल्डन अवर’मध्ये प्राण वाचविण्यासाठी होणार मदत राष्ट्रीय महामार्ग ५३ हा पूर्व-पश्चिम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. या मार्गावर आंतरराज्यीय तसेच राज्यांतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी, अपघात घडल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक ठरते. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ हा जखमींचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने निर्णायक असतो. या कालावधीत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची भूमिका समितीने घेतली आहे. चौकट आधुनिक यंत्रणेसह प्रशिक्षित कर्मचारी सध्या महामार्गावर उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका सुविधांवर गंभीर अपघातांमधील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादाची वाढती गरज लक्षात घेता अतिरिक्त दोन ॲडव्हांस लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णवाहिका अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असणार आहेत. त्यामुळे अपघातस्थळीच जखमींना प्राथमिक तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार आहे. महामार्गावरील अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे, आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळण्यास लागणारा वेळ घटविणे आणि प्रवाशांची सुरक्षितता जपणे, या व्यापक उद्देशाने जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने ही शिफारस केली आहे.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT