Advay Hirey news esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक; ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नरेश हाळणोर

Nashik Crime : जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे डॉ अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमधुन अटक केली. (Advay Hiray arrested from Bhopal in fraud case nashik crime news)

गेल्या दोन आठवड्यांपासून हिरे फरार झाले होते. ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिसही हिरे यांच्या मागावर होते. रेणुका सुत गिरणीच्या नावाखाली नाशिक जिल्हा बँकेतून अद्वय हिरे यांनी ७.४६ कोटीचे कर्ज घेतले होते. परंतु या कर्जाची त्यांनी परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केला आहे.

परतफेड न केल्याने कर्ज २५ कोटींवर गेले आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी जिल्हा न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही अद्वय हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. गेल्या दोन आठवड्याआधीपासून हिरे फरार आहेत. तर गेल्या काही दिवसात भद्रकाली व नंतर नाशिकरोड पोलिसांत ही गुन्हे दाखल झाले आहेत.

हिरे भोपाळमध्ये लपून असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री एका हॉटेलमधून अटक केलयाचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT