नाशिक

साहसाचा थरार, आरोग्याची खबरदारी

CD
लेख क्रमांक ४ ------------ उपशीर्षक ट्रेकिंग, स्कुबा अन् जंगल सफारी -------------------------- मुख्य शीर्षक साहसाचा थरार, आरोग्याची खबरदारी हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांवर ट्रेकिंग, समुद्राच्या खोल पाण्यात स्कुबा डायव्हिंग किंवा घनदाट जंगलात भटकंती... साहसी पर्यटनाचा थरार अनुभवताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. बदलते हवामान, विरळ हवा, पाण्याचा वाढता दाब आणि जंगलातील संभाव्य धोके यांची पूर्वकल्पना असणे आवश्यक आहे. त्यामुळे साहसी पर्यटनाला निघण्यापूर्वी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. - डॉ. रविराज खैरनार काही बाबतीत आपण कोणत्या प्रकारचा प्रवास करणार आहोत त्यानुसार नियोजन करावे लागते. काही साधारण नियम सगळीकडे लागू होतात जशा काही जनरल तपासण्या हिमोग्लिबिन, रक्तातील साखरेच्या तपासण्या सर्वांसाठी आवश्यक असतात. चाळीशीनंतर आणखी काही तपासण्या आवश्यक असतात त्याकरिता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्त लघवीच्या तपासण्या, इसीजी, 2 D Echo, stress test ह्या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्याव्यात. तपासणी दरम्यान काही आजार आढळल्यास प्रवास करावा की नाही ह्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. एखादा माहीत असलेला आजार असल्यास डॉक्टरांकडून आपली औषधे लिहून घेऊन प्रवासात जवळ बाळगावीत. जसे ‘बीपी’च्या, मधुमेहाच्या गोळ्या, अस्थमा असल्यास पंप, ॲलर्जीसाठी घ्यावयाची औषधे सोबत ठेवावी. त्याचबरोबर सर्वांनी जुलाबाच्या गोळ्या, ॲसिडीटी, उलटी, मळमळ, गाडी लागणे याच्या गोळ्या व ओआरएस सोल्युशन याचे पाकीट सोबत बाळगावी. फस्ट एडसाठी बँडेड, अँटिसेप्टिक क्रीम, बरनॉल क्रीम सोबत ठेवावे. वरील सर्व तयारी झाल्यानंतर विशिष्ट काय काळजी घ्यावी हिमालयात ट्रेकिंग करताना.. हिमालयात ट्रेकिंग करताना थंडी आणि विरळ हवा याचा सामना करावा लागतो. जसेजसे आपण उंच प्रदेशात जाऊ लागतो थंडी वाढत जाते आणि विरळ हवेतील ऑक्सिजन कमी होऊ लागतो. ह्याचा शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. ९ हजार फूट आणि त्यापेक्षा उंचीवर जातांना त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते. थंडीपासून बचावासाठी थर्मल कपडे, वूलन सॉक्स, हातमोजे, कानटोपी, बलकलावा या प्रकारची कानटोपी सोबत हवी. हिमालयात सर्वात जास्त धोका AMS म्हणजे Acute Mountain Sickness चा असतो, कारण आपण सर्वसाधारण हवेच्या प्रदेशातून विरळ हवेच्या प्रदेशात जातो. त्याचा शरीरावर परिणाम होतो. ह्याची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी, बोलताना धाप लागणे, चिडचिड होणे, लघवी कमी होणे असा त्रास होऊ लागल्यास त्वरित आपल्या टूर गाइडला त्याची कल्पना द्यावी. आवश्यक असल्यास लगेचच खालील प्रदेशात जाण्यासाठी प्रयत्न करावा ज्यामुळे जिवावरील धोका टाळतो. सर्वात मोठा धोका फुप्फुसात पाणी होण्याचा असतो. AMS कसा टाळावा? - एक-दोन दिवस शरीराला हिमालयातील अनुकूल प्रदेशाशी जुळवून घेण्यासाठी द्यावे. - भरपूर पाणी प्यावे जेणेकरून लघवीचा रंग फिकट राहील. - ट्रेक सुरू केल्यानंतर सुरवातीचे काही दिवस धिम्या गतीने चालावे. - ट्रेकला जाण्याआधी एक महिना आधी चालण्याचा, टेकडी चढण्याचा सराव करावा . - डॉक्टर आणि गाइड ह्यांच्या सल्ल्याने डायमॉक्स सारख्या गोळ्या सुरू कराव्या ज्यामुळे AMS चा त्रास कमी होऊ शकतो स्कुबा डाइविंग समुद्रात खोल पाण्यात करून आतील विस्मयकारक सुंदर विश्व पाहण्याचा साहसी प्रकार स्कुबा डाइविंग आहे. हिमालयात जशी योग्य काळजी घ्यावी लागते तशीच पाण्यात खोलवर जातांना घ्यायला हवी. पाण्यात जातांना पाण्याचा शरीरावरील दबाव वाढत जातो. ह्या दबावाची शरीराला सवय होण्यासाठी हळुवारपणे खोल पाण्यात जावे लागते. पाण्याच्या दबावाचा रक्तदाब आणि कानाचे पडदे ह्यांच्यावरील दबाव वाढवतो. त्यामुळे आधीच तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट सोबत ठेवणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा जागेवर पोहोचल्यावर फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास स्कुबा इंस्ट्रक्टर स्कुबा डाइविंग करू देत नाहीत. कानाचे आजार असलेल्यांनी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्या शिवाय स्कुबा डाइविंग करू नये. स्कुबा डाइविंग करण्याआधी एक डिस्क्लेमर फॉर्म भरून घेतला जातो, कारण ह्यात काही संभाव्य धोके असू शकतात . काय काळजी घ्यावी... - योग्य माहिती घेऊन अनुभवी स्कुबा प्रशिक्षकाकडून स्कुबा डाइविंग करावे - श्वसनाचे व्यायाम नियमित करावे. योग अभ्यास शिकलेल्यांनी प्राणायाम करावे - आपले आजार लपवू नका - स्कुबा प्रशिक्षकाकडून पाण्याखाली असताना हातांचे संकेत समजून घ्यावे. - त्रास होत असल्यास कोणता संकेत सांगावा ह्याची नीट उजळणी करावी. - धीम्यागतीने खोल पाण्यात जावे जेणेकरून शरीराला त्याची सवय होते. - डाइविंग सूट, ऑक्सिजन सिलिंडर आदी नीट तपासून घ्यावे. - योग्य काळजी घेतल्यास हा साहस प्रकार करायलाच हवा असा आहे. जंगल भटकंती वरील दोन्ही प्रकारांपेक्षा जंगल भटकंती थोडा वेगळा प्रकार आहे. इथे तुम्ही निसर्गात वावरता आणि त्याचा आनंद लुटत असता तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास काय काळजी घ्यावी त्याविषयी.. - वातावरणानुसार कपडे, पुरेसा पाणीसाठा (२ लीटर) सोबत खाऊ असावा. - तब्येतीप्रमाणे आवश्यक औषधे सोबत असावीत. - मधुमेही रुग्णांना जंगलात कमी साखरेचा त्रास झाल्यास गोड पदार्थ ठेवावा. - झरे, ओहोळ ह्यातून पाणी पिताना त्यात एक लीटर पाण्यात एक थेंब क्लोरीन ड्रॉप टाकून तासाभरानंतर पाणी प्यावे. - ओआरएस पाकीट, एखादे एंटीबायोटिक सोबत बाळगावे. - स्थानिक जनतेशी प्रेमाने संवाद साधावा, त्यांना रोजगार मिळेल असे पाहावे. - टूर गाइडची सोबत घेणे, नाश्ता, जेवण त्यांच्याकडून घेतल्यास ऋणानुबंध तयार होतो व मदत देखील चटकन मिळते. - जंगलातील भटकंती करताना अनुभवी व्यक्ती सोबत असणे अत्यावश्यक आहे अन्यथा वाट चुकण्याचा संभव असतो. - रात्री जंगलातील मुक्काम असल्यास डासांपासून संरक्षण करावे. - अनोळखी झाडे, फुले, फळे ह्यांना हात लागल्यास ॲलर्जीचा धोका असतो. - जंगलात जातांना परफ्युम, बॉडी स्प्रे, अत्तर लावून जाऊ नये मधमाश्यांच्या हल्ल्याचा धोका वाढतो. - जवळील आरोग्य केंद्र, डॉक्टरांची उपलब्धता ह्याची माहिती आधीच सोबत असावी. एकंदरीत वरील सर्व साहस प्रकार करायला हवे असेच आहेत. योग्य नियोजन, डॉक्टरांचा सल्ला, प्रतिबंधात्मक उपाय आधीच केल्यास हा प्रवास अत्यंत आनंददायी व संस्मरणीय होतो. (लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ व पर्यावरण प्रेमी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT