onion esakal
नाशिक

अफगाणिस्तानचा कांदा अमृतसरमध्ये; नाशिकचा ‘उन्हाळी’ खातोय भाव

महेंद्र महाजन

नाशिक : पावसाने राजस्थान आणि दक्षिणेतील कांद्याचे नुकसान केले असल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा सध्या भाव खातोय. अफगाणिस्तानमधून (afghan onion) कांद्याचे २५ ट्रक भारताकडे रवाना झाले आहेत. त्यातील ६ ट्रकभर कांदा अमृतसरमध्ये (amritsar) दाखल झाला आहे. किलोला २५ ते २६ रुपये असा त्याचा भाव आहे. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचा किलोचा भाव सरासरी ३८ ते ३९ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, पुण्यात आज कांद्याचा क्विंटलचा भाव ३५ रुपये असा राहिला.

पावसाने राजस्थान आणि दक्षिणेतील कांद्याचे नुकसान केले असल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा सध्या भाव खातोय. जिल्ह्यातही पावसाने रोपांसह कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अशातच, नवीन लाल कांद्याची विक्री सुरु झाली आहे. शनिवारी (ता. १६) लासलगावमध्ये लाल कांद्याचा क्विंटलचा भाव २ हजार ५६०, तर सरासरी १ हजार ९०० रुपये असा राहिला. तसेच उन्हाळ कांदा लासलगावमध्ये ३ हजार ६४० आणि सरासरी ३ हजार ३५०, तर पिंपळगाव मध्ये ४ हजार २०० व सरासरी ३ हजार ४५१ रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. येवल्यात ३ हजार ७१२ व सरासरी ३ हजार १००, कळवणमध्ये साडेचार हजार आणि सरासरी साडेतीन हजार, तर चांदवडमध्ये ३ हजार २९० व सरासरी २ हजार ८००, उमराणेमध्ये ३ हजार ५५० आणि ३ हजार रुपये सरासरी क्विंटल असा भाव निघाला होता. देशाला पुरवठा करणाऱ्या राजस्थान आणि कर्नाटकमधील कांद्याच्या नुकसानीमुळे सोमवारी (ता. १८) नाशिकच्या बाजारपेठेत उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती काय राहणार? यावर देशातंर्गत पाठवला जाणार की निर्यातीचा विचार होणार याचे सूत्र ठरण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याची निर्यातबंदी केली होती. मध्यंतरी कांद्याचे भाव ४२ रुपये किलोच्या पुढे पोचताच, केंद्राकडून निर्यातबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, या भीतीने सलग दोन दिवस स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल राहिली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे निर्यातदारांचे लक्ष लागले होते. मात्र आता ऑक्टोंबरचा तिसरा आठवडा सुरु झाला, तरीही निर्यातबंदी झाली नसला, तरीही कांद्याच्या भावात अद्याप म्हणावी तितकी तेजी राहिलेली नाही. त्यामुळे आगामी काळात व्यापाऱ्यांकडून उन्हाळ कांद्याला ४५ रुपये किलो असा घाऊक बाजारभाव मिळणार काय? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सीमेवरील परवानगीअभावी १९ ट्रक उभ्या

निर्यातदारांना मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधून बेदाण्याच्या ३०० आणि कांद्याच्या १९ ट्रक एकात्मिक तपासणी नाक्यापर्यंत पोचल्या आहेत. परवानगीसाठी या ट्रक उभ्या आहेत, अशीही माहिती निर्यातदारांची आहे. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तान आणि भारतातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. तालिबानींनी अफगाणिस्तानच्या तोरखम आणि चमन सीमा सील केल्या होत्या. व्यापारासाठी भारत आणि अफगाणिस्तानसाठी या दोन सीमा असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमधून भारतीय व्यापारी सुकामेवा, कांदा आणि सफरचंदची आयात करतात. अफगाणिस्तानमध्ये कांद्याचे उत्पादन मोठे असल्याने निर्यातीखेरीज तेथील व्यापाऱ्यांपुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. अटारीच्या एकात्मिक तपासणी नाक्यामधून अफगाणिस्तानमधील बल्ख आणि गझनीचे लाल कांदे तमिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्‍मिरला जातात. भारतात माल पोचण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो.

अफगाणिस्तानचा कांदा भारतात येण्यास सुरवात झाल्याने कांद्याच्या भावात घसरण होईल, असे आडाखे बांधले जात आहेत. मात्र भारताची गरज पाहता, अफगाणिस्तानमधून येणारा कांदा खूप कमी आहे. त्यामुळे देशातंर्गत कांद्याच्या भावावर फारसा परिणाम करेल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. -विकास सिंह, निर्यातदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT