Africa highest Mount Kilimanjaro from Nashik set a world record
Africa highest Mount Kilimanjaro from Nashik set a world record sakal
नाशिक

अंशुलकडून आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील अंशुल वैजनाथ काळे याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च पर्वत शिखर किलिंमंजारो सर केला आहे. या माध्यमातून त्‍याने जागतिक विक्रम केला आहे. सात वर्षे अकरा महिने वय असलेल्‍या अंशुलने ही कामगिरी वडीलांसोबत केलेली आहे. तो फ्रावशी अकॅडमीत शिक्षण घेत आहे. अंशुल हा आफ्रिका खंडातील सर्वोच शिखर किलीमांजारो कृत्रिम ऑक्सीजनशिवाय सर करणारा जगतील पाहिला बालक ठरला आहे. अंशुल काळे व वैजनाथ काळे या पिता-पुत्राने अनोखी कामगिरी करत इतिहास घडवला आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोरर व अबेकोम्ब्बे टूर्स टांझानिया यांच्यातर्फे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी सव्वा आठला बाप-लेकाने किलीमांजारो शिखरावर भारताचा तिरंगा फडकावून विश्‍वविक्रम केला.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून, याची उंची समुद्र सपाटी पासून १९ हजार ३४१ फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, घोंगावत वाहणारे वारे, पाऊस, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक ही मोहीम पूर्ण केली. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी १३ मार्चला सुरवात केली होती. येत्या काळात अंशुल काळे हा युरोप व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार असून, जगातील सात सर्वोच्च शिखर सर (सेव्हन समिट) करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

''खराब वातावरणामुळे सुरवातीला भीती वाटली. स्वतः आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असलेले वडील माझ्यासोबत खंबीरपणे होते. सोबतची टीम, आई ज्योती काळे व परिवारातील अन्‍य सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्‍वी कामगिरी करता आली.''

-अंशुल काळे, बाल गिर्यारोहक

''मुलासोबत किलीमांजरो मोहिमेत भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी आतुर होतो. सर्वात लहान वयात अंशुलने कृत्रिम ऑक्सिजनशिवाय मोहीम केली. तो माझ्याही पुढे शिखरावर पोचला. विश्‍वविक्रम करणे हे धेय्य नव्हते. पण, कामगिरी बजावताना तो ज्या मानसिक व शारीरिक कसरतींमधून कणखर बनुन प्रवास करणार होता, तिच त्याच्या आयुष्याची खरी शिदोरी त्याला द्यायची होती.''

-वैजनाथ काळे, गिर्यारोहक व अंशुलचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT