A leopard standing on the roof of a bungalow in Ujani Shivara. esakal
नाशिक

बिबट्याची नारळानंतर आता बंगल्यावर स्वारी; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात रविवारी (ता. १८) सकाळी नारळाच्या झाडावर पाठशिवणीचा खेळ केल्यानंतर बिबट्याने सोमवारी (ता. १९) सायंकाळी एका बंगल्याच्या छतावर दर्शन दिले. त्यामुळे सांगवी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याच भागात सोमवारी दुपारी बिबट्याला वडाच्या झाडावर आराम करून खाली उतरताना अनेकांनी बघितले. (After coconut leopard now rides on bungalow atmosphere of terror among farmers Nashik Latest Marathi News)

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी शिवारात घुमरे वस्तीवर नारळाच्या झाडावर दोन बिबटे मस्ती करत असल्याची घटना शेतकऱ्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात छायाचित्रित केली होती. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावले होते. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगवी शिवारात खोल रस्त्यावरील एका बंगल्यावर बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले.

या बंगल्यात कुणी राहत नसल्याने तो बंद असल्याचे सांगण्यात आले. वन विभागाला या घटनेची माहिती तातडीने देण्यात आली. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास शरद घुमरे यांच्या वडाच्या झाडावर बिबट्या आराम करीत असल्याचे काहींनी पाहिले. थोड्या वेळाने बिबट्या ऐटीत वडाच्या झाडावरून खाली उतरला.

सोमठाणेत शेळी पळविली

सांगवी-सोमठाणे गावाच्या शिवेवरील प्रमोद धोक्रट यांच्या वस्तीवरून बिबट्याने शेळीला ओढत नेऊन बाजूच्या उसाच्या शेतात नेले. परिसरात बिबट्यांची संख्या वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नांदूरशिंगोटेतदेखील दहशत

मंगळवारी रात्री बिबट्याने नांदूरशिंगोटे येथील एकलव्यनगर भागात एक पाळीव कुत्रा व वासरावर हल्ला करून ठार केले. बाळासाहेब कारभारी शेळके यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासराचा बिबट्याने बाहेर फडशा पाडला, तर शेजारच्या वस्तीवर कैलास भाबड यांच्या मनोहर नावाच्या कुत्र्यालादेखील शिकार बनविले.

गेल्या ३० मेस सोमनाथ मेंगाळ यांच्यावर हल्ला करून बिबट्याने त्यांना जखमी केले होते. तेव्हापासून परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. अनेक कुत्र्यांना बिबट्याने यापूर्वी सावज बनविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT