Rain updates Rain
नाशिक

महिन्याच्या विश्रांतीनंतर मालेगावात पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधान

प्रमोद सांवत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात तब्बल महिन्याच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. १७) पावसाने हजेरी लावली. कमी- अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. पावसामुळे शहरातील अनेक नवीन वसाहतींमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली. गटारी व सांडपाण्याची निकासी नसलेल्या भागातील रहिवाशांचे यामुळे हाल झाले.

सलग दोन वर्षे तालुक्यात सरासरीच्या दोनशे टक्के पाऊस झाला. यावर्षी मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अडीच महिन्यांत अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या बळावर खरिपाच्या पिकांची पेरणी करण्यात आली. मका, बाजरी व कपाशीचे पीक घेतले जात आहे. महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली होती. मंगळवारी दुपारी सर्वत्र दीड ते दोन तास रिमझिम पाऊस झाला. तग धरून असलेल्या पिके वाचू शकतील. मात्र, उत्पादनात काही प्रमाणात घट होईल. दिवसभरात सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ५६७ मिलिमीटर आहे. आतापर्यंत केवळ ४० ते ४५ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. पावसाअभावी नद्या, नाले, तलाव, पाझर तलाव, विहिरी कोरड्याठाक आहेत. रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाऊस लांबल्याने तालुक्यात ७० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरी एवढा पाऊस झाला, तरच विहिरींना पाणी उतरू शकेल. आगामी रब्बी हंगामाचे भवितव्यही पुढील दीड महिन्याच्या पावसावर अवलंबून आहे. तालुक्यासह कसमादेतील हरणबारी वगळता इतर धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही. कसमादेत पुरेसा पाऊस नसल्याने गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. समाधानकारक पावसामुळे गिरणा धरण सलग दोन वर्षे ओव्हर फ्लो झाले होते. याचा फायदा जळगाव जिल्ह्याला झाला होता. कसमादेतील पावसाकडे खान्देशवासीयांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT