work of installing the gattu started after the demand of the citizens. esakal
नाशिक

Nashik : नागरिकांच्या विरोधानंतर रस्त्यात सिमेंटचे गट्टू बसविण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : विजयनगर ते दत्त चौक मुख्य रस्त्यात तात्पुरत्या डागडुजीला नागरिकांनी प्रखर विरोध केल्याने संबधीतांना नागरिकांच्या मागणीनुसार गट्टू बसवण्यात आले. या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. (After protest of citizens installation of cement blocks on road has started Nashik Latest Marathi News)

डांबर सदृश केमिकल टाकुन ते दाबण्याचा प्रयत्न होता, पंरतु जागरुक नागरिकांनी विरोध दर्शविला. रस्ता पुन्हा कोरुन तिथे सिमेंटचे गट्टू लावण्याची मागणी केली. मागणीसाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सतिश खैरनार, शिवाजी बरके, अर्जुन वेताळ, जितु जाधव यांनीदेखील कामाला विरोध केला.

बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आणि ताबडतोब येथे गट्टु बसविन्याची मागणी केली. लागलीच आता गट्टु लावले जातील, असे मनपा बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगत कामाला सुरवात केली. या वेळी रामेश्वर शिंदे, विनायक चौधरी, विवेक कर्नावट, हर्ष शिंदे, ताराबाई चौधरी, दादा ईप्पर आदींसह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT