st bus st bus
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात बससेवा पुन्‍हा ठप्प; कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

अरुण मलाणी

नाशिक : एसटी कर्मचार्यांच्‍या राज्‍यव्‍यापी आंदोलन नाशिक जिल्‍ह्यात पुन्‍हा तीव्र झाले आहे. जिल्‍ह्यातील तेरा आगारांपैकी बारा आगारातील बसगाड्या बंद करण्यात आल्‍या आहेत. तर इगतपुरी या एकमेव आगारातील सेवादेखील बंद होण्याच्‍या मार्गावर आहे. आशात सोमवारी (ता.८) जिल्‍ह्यातील एसटी बससेवा ठप्प झाली.

ऐन दिवाळीच्‍या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. काही दिवसांपूर्वी आंदोलन मागे घेतल्‍याच्‍या चर्चेने एसटी बससेवा सुरळीत होत होती. राज्‍यातील अन्‍य काही भागांमध्ये आंदोलन सुरु असताना नाशिकमध्ये मात्र बसगाड्या सोडण्यात येत होत्‍या. मात्र काल (ता.७) सायंकाळनंतर जिल्‍ह्‍यात आंदोलन पुन्‍हा तीव्र झालेले आहे. त्‍यातच सोमवारी (ता.८) जिल्‍ह्‍यातील बारा आगारांतील बससेवा ठप्प राहिली. यामुळे नियोजित असलेल्‍या दोन हजाराहून अधिक बसफेर्या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढावली आहे. जिल्‍ह्यातील बारा आगार बंद असतांना इगतपुरी आगारातील वाहतुक काही प्रमाणात सुरु होती.

प्रवाश्‍यांचे हाल अन्‌ मनस्‍ताप

दरम्‍यान आंदोलनामुळे एसटीबस मिळणे मुश्‍कील झालेले होते. अशात प्रवाश्‍यांचे हाल तर झाले त्‍यांना मनस्‍तापालादेखील सामोरे जावे लागले. अनेक प्रवाश्‍यांना बसस्‍थानकावर आल्‍यानंतर संपाची माहिती मिळत होती. त्‍यामुळे अनेक प्रवाश्‍यांची गैरसोय होत होती. काहींकडून मिळेल त्‍या गाडीत, उभे राहून प्रवास करण्याची वेळ ओढावली होती.

खासगी ट्रॅव्‍हल्‍सने साधली संधी

एसटी बससेवा प्रभावित झालेली असतांना, दुसरीकडे बसस्‍थानक परीसरात खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या गाड्या उभ्या दिसल्‍या. प्रमुख मार्गांवर लहान चारचाकी वाहनांपासून तर मोठ्या बसगाड्या उपलब्‍ध करुन दिल्‍या होत्‍या. या अडचणीची संधी साधतांना चढ्या दराने प्रवाश्‍यांकडून पैसे आकारले जात असल्‍याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT