Maharashtra Tourism Development Corporation Deputy Director Madhumati Sardesai while inaugurating the first Jaswand Bagh initiative in the state at the bird sanctuary on Sunday. esakal
नाशिक

Nashik News: पक्षी अभयारण्य परिसरात सुरू करावे कृषी पर्यटन; मधुमती सरदेसाई यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी देशभरातून येतात. त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था शेतकरी करू शकतात.

त्यासाठी अभयारण्य परिसरात शेतकऱ्यांना कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभेल, असे महामंडळाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी सांगितले.

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात जास्वंद बाग या उपक्रमाचा प्रारंभ श्रीमती सरदेसाई यांच्या हस्ते पक्षी अभयारण्यात करण्यात आला, त्या वेळी त्यांनी जास्वंद बाग निर्माण केल्याने परिसरात फुलपाखरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार असल्याचे सांगितले.

संस्थेतर्फे १०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यांचे संवर्धन संस्थेतर्फे केले जाईल. परिसरात दोन महिन्यांत संस्थेतर्फे २०० जास्वंदाची रोपे लावण्यात येतील. राज्यातील हा पहिला प्रकल्प होत असल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, विभागीय वनाधिकारी डॉ. सुजित नेवसे, गणेश रणदिवे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, चापडगावचे सरपंच अनिल सोनवणे, मांजरगावचे सरपंच सुनील सोनवणे, वर्किंग प्लान ऑफिसर भगवान ढाकरे, ‘लेपर्ड मॅन' उपाधी मिळालेले सुनील वाडेकर आदी उपस्थित होते.

विभागीय वनाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल डॉ. नेवसे, श्री. रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपक्रमासाठी मदत करणारे गणपत हाडपे, सीमा पाटील, राहुल वडघुले, सीमा तंगनवाडे, डॉ. जयंत फुलकर, किशोर वडनेरे, मेहुल थोरात, विशाल देसले, पंकज चव्हाण, अनंत सरोदे आदींचा सत्कार झाला. प्रा. बोरा, वनपाल प्रीतिश सरोदे यांनी संवाद साधला. दर्शन गुगे यांनी आभार मानले.

वन विभागाला विनंती

पावसाळ्यात पर्यटक भटकंतीसाठी जात आहेत. वन विभागाने पर्यटकांना दोन महिने फिरण्यास बंद घातली. सरसकट बंदी घालण्याऐवजी कास पठारच्या धर्तीवर उपाययोजना केल्या जाव्यात, जेणेकरून दुर्घटना कमी होतील.

निसर्गाला हानी पोचणार नाही. पर्यटकांची संख्या वाढेल, अशी विनंती वन विभागाला करण्यात आली. त्याचवेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे पर्यटनस्थळावर प्लास्टिक बंदी करावी, असेही सुचविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT