Heavy Rain in Crop Field esakal
नाशिक

Rain Update : राज्यात 115.7 अन जिल्ह्यात 131.2 टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परतीच्या पावसाने शेतीची दाणादाण उडवली आहे. छाटलेल्या द्राक्षबागांमधून पावसाचे पाणी साठू लागल्याने शेतकऱ्यांचा फवारणीवरील खर्चात वाढ झाली आहे. तसेच सोयाबीन, मका, टोमॅटो, कांदा रोपे, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. राज्यात ११५.७, तर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १३१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये आज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत १०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Agricultural damage due to return rains Nashik rain Update News)

निफाड तालुक्यात छाटलेल्या द्राक्षबागांपुढे परतीच्या पावसाने गंभीर प्रश्‍न उभा केला आहे. सोंगणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तसेच विंचूर भागात ढगफुटीसदृश्‍य पावसाने झोडपल्याने विहिरी, नदी, नाले तुडुंब भरले असून वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच इगतपुरीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने भाताच्या नुकसानीत भर पडली आहे. चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा, कांदा रोपे, सोयाबीन, मक्याचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील १४ धरणांमधून सध्यस्थितीत विसर्ग सुरु आहे. आज (ता.१२) सायंकाळी धरणांमधून सुरु असलेला विसर्ग क्युसेसमध्ये असा : नांदूरमधमेश्‍वर-७ हजार ९२४, गिरणा-२ हजार ४७६, आळंदी-३०, पालखेड-८७५, ओझरखेड-४९१, पुणेगाव-७५, दारणा-७००, भावली-२६, वालदेवी-६५, भोजापूर-७६, चणकापूर-३७९, हरणबारी-३६०, केळझर-७५, नाग्यासाक्या-२१२. दरम्यान, जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या २४ धरणांमध्ये सध्यस्थितीत १०० टक्के जलसंचय झाला आहे. गेल्यावर्षी धरणांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता.

ऑक्टोबरमध्ये २०३ टक्के पाऊस

जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये २०३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी याप्रमाणे : मालेगाव-१७०.५, बागलाण-१७२.८, कळवण-१८४.३, नांदगाव-१५५.३, सुरगाणा-१२९.६, नाशिक-१५१.९, दिंडोरी-२३७.६, इगतपुरी-७६.३, पेठ-१३६.१, निफाड-१६९.९, सिन्नर-१६०.९, येवला-१३८.२, चांदवड-२०५.१, त्र्यंबकेश्‍वर-१०२.५, देवळा-१८७.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT