nashik agriculture esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यातील जमीन सुपीकतेत 15 वर्षात मोठा बदल!

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील शेतीच्या आरोग्याच्या तपासणीत (Agricultural-health-inspection) १९८० ते २००५ या कालावधीत नत्राचे प्रमाण मध्यम, स्फुरदचे प्रमाण कमी, तर पालाशचे प्रमाण भरपूर आढळले होते. कृषी विभागाच्या गावनिहाय जमीन सुपकता निर्देशांक आणि सूक्ष्म मूल्यद्रव्ये कमतरता तपासणीत गेल्या १५ वर्षांमध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. नत्राची कमतरतेत मोठ्या प्रमाणात वाढ, स्फुरदची उपलब्धता मध्यमकडे, तर पालाश भरपूर उपलब्ध आहे. (Agricultural-health-inspection-in-nashik-district-marathi-news)

स्फुरदची मध्यम उपलब्धतेकडे वाटचाल अन्‌ पालाश भरपूर उपलब्ध

कळवणमध्ये जस्त, लोहाचे, निफाडमध्ये लोह, बोरॉनची, तर पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शेतीत जस्त, बोरॉन, सल्फरची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्याच्या इतर भागात जस्त, लोह, बोरॉन, सल्फरची कमतरता अनेक गावांत आहे. मुळातच, मागील तीन दशकांमध्ये शेतीच्या तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. हरितक्रांती, श्‍वेतक्रांती, नीलक्रांती शेतकऱ्यांनी घडवून आणली आहे. प्रगतीचे हे टप्पे गाठत असताना उत्पादनवाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशकांच्या वापराकडे कल वाढला आहे. त्याचवेळी सेंद्रिय खतांचा कमी वापर आणि पाण्याचा अयोग्य वापरातून शेतीमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. जमिनीला कमी विश्रांती मिळत असताना धूप, माती व पाण्याचे प्रदूषण, कीटकनाशकांची वाढलेली प्रतिकारशक्ती या समस्यांचा विळखा शेतीला पडला आहे. अन्नद्रव्यांच्या कमतरतेअभावी शेतीच्या पोषणाचा प्रश्‍न ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. देशात शेतीमध्ये नत्राची ८९, स्फुरदची ८०, तर पालाशची ५० टक्के कमतरता आढळून आली आहे. त्याचप्रमाणे जस्ताची ४९, गंधकाची ४१, बोरॉनची ३३, लोहाची १२, मंगलची १२, तांब्याची पाच टक्के कमतरता असल्याचे तपासणीत आढळले. कृषी पंढरी नाशिक जिल्ह्यात मात्र तांब्याच्या कमतरतेचा प्रश्‍न खूपच कमी आहे.

प्राण्यांच्या सर्वांगीण वाढीवर विपरीत परिणाम

महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे अन्नद्रव्यांची कमतरता आढळली. जस्ताची ४५, गंधकाची ४१, लोहाची २२.६, बोरॉनची २०.३ टक्के कमतरता आढळून आली होती. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे व असंतुलित खत वापरामुळे पिकांवर विकृतीची लक्षणे दिसतात. पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर आणि पौष्टिकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे. पर्यायाने प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक प्रकारच्या आजारांना अथवा व्याधींना सामोरे जावे लागते. त्यात अशक्तपणा, मधुमेह, रक्तदाब, हाडाचे विकार, सांधेदुखी, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, हृदयविकार आदींचा समावेश आहे. अपौष्टिक अन्नपदार्थांमुळे लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठांमध्ये असमतोल आहारामुळे तयार होणारे आरोग्य प्रश्‍न दिसतात. जनावरांमध्येही निकृष्ट चारा दिल्याने त्यांच्या वाढीवर, दुग्धोत्पादनावर, कोंबड्यावरही परिणाम होत आहे. प्राण्यांच्या सर्वांगीण वाढीवर, कार्यक्षमतेवर व आयुष्यमानावर विपरीत परिणाम होत आहे.

अन्नद्रव्य कमतरेची लक्षणे

अन्नद्रव्यांच्या कमरतेमुळे पिकांमधील आढळणारे लक्षणे अशी : नत्र- झाडाची खालची पाने पिवळी होतात. मूळ व झाडांची वाढ खुंटते. फळे कमी येतात. स्फुरद-पाने हिरवट लांब होऊन खुंटतात. मागील बाजू जांभळ्या रंगाची होते. पालाश-पानांच्या कडा तांबूस होतात. तांबड्या आणि पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. शेंडे गळून पडतात. लोह-पानांच्या शेंड्याकडील शिरामधील भाग पिवळसर होतो. झाडांची वाढ खुंटते. बोरॉन-शेंडा व कोवळी पाने जळतात. फळांवर तांबूस ठिपके येऊन भेगा पडतात. जस्त-पाने लहान होतात. पाने वाळतात. मंगल-पाने पिवळी होतात. पानगळ होते. तांबे-खोडाची वाढ कमी होऊन पानगळ होते. गंधक-पाने पिवळी पढून पांढऱ्या रंगांची होतात. ही लक्षणे आढळल्यावर शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागातर्फे दिला जातो.

तालुकानिहाय जमीन सुपिकतेची स्थिती

(राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या आरोग्यपत्रिका २०२० मधील स्थिती)

तालुक्याचे नाव नत्र स्फुरद पालाश

बागलाण कमी मध्यम मध्यम

चांदवड मध्यम मध्यम मध्यम

देवळा कमी मध्यम मध्यम

दिंडोरी मध्यम मध्यम मध्यम

इगतपुरी कमी मध्यम कमी

कळवण मध्यम अत्यंत भरपूर भरपूर

मालेगाव कमी मध्यम मध्यम

नांदगाव कमी मध्यम कमी

नाशिक कमी भरपूर मध्यम

निफाड कमी मध्यम मध्यम

पेठ कमी मध्यम मध्यम

सिन्नर कमी मध्यम मध्यम

सुरगाणा कमी मध्यम मध्यम

येवला कमी मध्यम मध्यम

त्र्यंबकेश्‍वर कमी मध्यम मध्यम

(अत्यंत कमी-०.५ ते ०.७५, कमी-०.७६ ते १.२५, मध्यम-१.२६ ते २.२५, भरपूर-२.२६ ते २.७५, अत्यंत भरपूर-२.७६ च्या पुढे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT