Crime esakal
नाशिक

Nashik Crime: मुदतबाह्य 13 लाखांच्या बियाण्यांवर ‘कृषी’ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाकडून बनावट खते व बियाणे विक्रीवर कारवाई सुरू आहे.

कृषी विभागातील जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे द्वारका परिसरातील अभिजित सीड्‌स प्रा. लि. बियाणे कंपनीत मान्यता नसलेली, तसेच मुदतबाह्य कांदा पिकाची सुमारे ५०० ग्रॅमची ८८५ पाकिटे (४४२.५ किलो बियाणे) जप्त करण्यात आली. (agriculture department action on expired 13 lakh seeds Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत सुमारे १३ लाख सात हजार ६८० रुपये इतकी आहे. तपासणीच्या वेळेस सदरचे बियाणे विक्रीकरिता पॅकिंग करीत असल्याचे आढळले.

जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरारी पथकातील कृषी उपसंचालक जगदीश पाटील, तंत्र अधिकारी (गुनि) संजय शेवाळे, जिल्हा मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, तंत्र अधिकारी अभिजित घुमरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पानपाटील, जगन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सदर कारवाई विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जिल्हा मोहीम अधिकारी जमधडे यांच्यातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT