नाशिक

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून शेतकर्यांना ड्रोन

CD
ड्रोनसह कृषी साहित्याला ५० टक्के अनुदान जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून शेतकऱ्यांना लाभ; लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून शेतकऱ्यांना किसान ड्रोन, विद्युत पंपसंच, कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व रोटाव्हेटर खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात आले असून, प्राप्त अर्जांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी वरुण पाटील यांनी दिली. किसान ड्रोनसाठी अनुसूचित जाती-जमाती, महिला, कृषी पदवीधर, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच ‘आत्मा’अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटांना खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल साडेतीन लाख रुपये अनुदान मिळेल. पाच अश्‍वशक्तीच्या विद्युत पंपसंचासाठी ५० टक्के किंवा कमाल आठ हजार रुपये, तर कडबाकुट्टी यंत्रासाठी ५० टक्के किंवा कमाल २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. ८ ते ७० पीटीओ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला लाभार्थींना ५० टक्के किंवा कमाल १ लाख २५ हजार रुपये अनुदान मिळेल. ट्रॅक्टरचलित २० अश्‍वशक्तीपर्यंतच्या रोटाव्हेटरसाठी ५० टक्के किंवा कमाल ३६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. कागदपत्रे आवश्यक स्वतःच्या नावाचा सातबारा उतारा, ड्रोन किंवा ट्रॅक्टर नसल्याचे दाखले, यापूर्वी संबंधित योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र आणि खरेदीनंतरचे कोटेशन आवश्यक आहे. विद्युत पंपासाठी पाण्याचा स्रोत व विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे. कडबाकुट्टी यंत्रासाठी पाच जनावरे असल्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, तर रोटाव्हेटरसाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : “पेपरफुटी थांबलीच पाहिजे!” विद्यार्थी आंदोलनात उतरले सुजात आंबेडकर, मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरकारवर ताशेरे

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT