Farmer spraying esakal
नाशिक

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार; पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात सतत बदलणाऱ्या वातावरणाचा कांदा पीकाला बसत असून थंडीचा वाढलेला जोर आणि पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदू मुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भिती वाढली आहे.

यामुळे दर दोन ते तीन दिवसाआड शेतकऱ्यांना पीकावंर फवारणी करावी लागत आहे. यासाठी महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याने फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अचानक हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मनमाड शहरासह ग्रामीण भागातील पीक सध्या धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली जात आहे. कांदा, गहू, हरभरा आदी पिके जोमात आहे.

अगोदर परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत आहे हातातोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच आता मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने तसेच पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदू यामुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती वाढली आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

रोपांच्या वाढीवर परिणाम

पहाटेच्या वेळेस दाट धुके पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणात बदल झाल्याने कांद्यावर रोग पडू लागला आहे.

यामुळे रोपांची वाढही खुंटली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी सध्या परिसरातील शेतकरी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

Heart Health: अतिरिक्त मीठ सेवनाने विकारांचा वाढता धोका; उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकारांची जोखीम

Home Remedy For Cold: बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय? मग आजीच्या 'या' देसी काढ्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल

Marathwada Rain: मराठवाड्यात घटले पावसाचे दिवस; गेल्यावर्षी २९, यंदा सोळाच दिवस

पत्नी प्रियकरासोबत पळून जायची, घटस्फोट मिळताच तरुणानं केली दुधानं अंघोळ; म्हणाला, मी स्वतंत्र झालो, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT