Agriculture News esakal
नाशिक

Agriculture News : टोमॅटोचे दर गडगडले; उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : मागील काही दिवसामध्ये टोमॅटोचे दर प्रमाणापेक्षा अधिक घसरल्याने पिकविलेला माल अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची परिस्थिती उत्पादक शेतकरी यांच्यावर आली आहे. बाजार समितीत टोमॅटोला प्रतिकिलो दोन ते चार रुपयाचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे देखील मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे टोमॅटोची लाली फिकी पडली आहे.

मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव सातत्याने खाली घसरत असल्याने उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. टोमॅटो हे चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने याची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत असतो. मागील महिन्यात टोमॅटोला चांगला भावही मिळाला होता. मात्र मागील काही दिवसात टोमॅटोचे दर चांगलेच पडले आहे.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

यातच सिन्नर बाजार समितीत प्रति किलो ३ ते सरासरी ३.५० रुपयांचा भाव टोमॅटोला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या अनेक टोमॅटो उत्पादकांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. यापूर्वी अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि आता भाजीपाला व पिकांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

सोमवारी येथील बाजार समितीत लिलावात टोमॅटोला प्रति किलो दोन ते तीन रुपयांचा भाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो सरासरी २.७५ पैसे म्हणजे, क्विंटलला २७५ रुपयांचा भाव मिळाला. तर किमान 3 ते साडेतीन रुपये किलो दराने म्हणजेच, तीनशे रुपये क्विंटल दराने आडात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला.

''व्यापारी उत्पादकांकडून प्रति किलो ३ रुपयांनी घेतलेला टोमॅटो भाजी मंडईत १० ते १२ रुपये किलो दराने विक्री करतात. त्यामुळे ही दरी कमी करत शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळायला हवा. शेतकरी आर्थिक तोट्यात असताना व्यापारी मात्र पाचपट नफा कमावीत आहे.'' - भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT