दोन कॉलम फोटो व बातमी
----
NSK26H32514
जळगाव : रायसोनी महाविद्यालयात एआय व सायबर सुरक्षेसंबंधी विषयावरील सहा दिवसीय चर्चासत्राचे नुकतेच उद्घाटन झाले.. चर्चासत्रात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. चरणसिंग कायते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
------
रायसोनी महाविद्यालयात एआय,
सायबर सुरक्षेसंबंधी चर्चासत्र
उपशिर्षक
सहादिवसीय चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागाच्या वतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अटल योजनेअंतर्गत ‘एआय फॉर डिजिटल फॉरेन्सिक्स अँड सायबर सिक्युरिटी : इमर्जिंग ट्रेंड्स अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स’ या विषयावरील सहा दिवसीय ऑफलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे (एफडीपी) उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे व म्हणून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक आणि सायबर सुरक्षा व डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. डॉ. चरणसिंग एन. कायते, तर अध्यक्षस्थानी संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या.
प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. डॉ. कायते, प्रा. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या एफडीपीमध्ये डिजिटल फॉरेन्सिक्सची मूलतत्त्वे, सायबर सुरक्षा, एआयचा फॉरेन्सिक तपासातील वापर, मोबाइल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, मशीन लर्निंग, मालवेअर विश्लेषण, सायबर धोक्यांची माहिती आणि इंट्रुजन डिटेक्शन यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण,प्रयोगशाळेतील उपक्रम आणि औद्योगिक भेटीचाही कार्यक्रमात समावेश आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.