नाशिक

२५ हून अधिक एआय सॉफ्टवेअर निर्मितीबद्दल सुनिल सोनटक्के यांना ‘एआय इनोव्हेशन अवॉर्ड’

CD
पान-१ ॲंकर YEO26B26748 नाशिक : येवला येथील सुनील सोनटक्के यांना पुरस्कार प्रदान करताना एमकेसीएलचे पदाधिकारी ------------- ३६-५ सुनील सोनटक्के यांना ‘एआय इनोव्हेशन अवॉर्ड’ ‘एमकेसीएल’तर्फे गौरव ः २५ हून अधिक एआय सॉफ्टवेअरची केली निर्मिती सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ ः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करत २५ हून अधिक एआय आधारित सॉफ्टवेअर विकसित केल्याबद्दल येथील आयसीएस कॉम्प्युटर्सचे सुनील सोनटक्के यांना महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) तर्फे ‘एआय इनोव्हेशन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. नाशिक येथील एनआयसी क्लस्टर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एआय तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण आणि प्रत्यक्ष उपयोग करून विविध प्रकारचे उपयुक्त सॉफ्टवेअर विकसित केल्याबद्दल सोनटक्के यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. आयसीएस कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सोनटक्के यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर विविध सॉफ्टवेअर आणि डिजिटल उपक्रमांच्या निर्मितीसाठी केला. विद्यार्थ्यांचे शिक्षण, परीक्षा सराव, डिजिटल व्यवस्थापन तसेच दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने त्यांनी विविध एआय आधारित प्रणाली विकसित केल्या आहेत. एआय तंत्रज्ञान केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित न ठेवता येवल्यासारख्या ग्रामीण व निमशहरी भागातूनही नाविन्यपूर्ण एआय सॉफ्टवेअरची निर्मिती होऊ शकते, हे सोनटक्के यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि संगणक क्षेत्रातील नव्या पिढीत एआय विषयी उत्सुकता निर्माण करण्यास मदत होत आहे. ---------------- कोट एमकेसीएलच्या पुरस्कारामुळे एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यास प्रेरणा मिळाली आहे. त्यादृष्टीने नक्कीच काम करेन. - सुनील सोनटक्के, येवला. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT