नाशिक

एआय''मुळे मानवजात नष्ट होणार नाही – डॉ. किरणकुमार जोहरे : मसगा महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा

CD
फोटो ओळी- 12012 मालेगाव शहर : मसगा महाविद्यालयात विज्ञान संघटनेचे उद्‍गाटन व आविष्कार कार्यशाळेप्रसंगी बोलताना डॉ. किरणकुमार जोहरे. शेजारी प्राचार्य डॉ. सुभाष निकम आदी. मसगा महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. २ : एआय तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने वापर करतो, यावरच त्याचे परिणाम अवलंबून असल्याचे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. मसगा महाविद्यालयात आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत विज्ञान संघटनेचे उद्‍घाटन व आविष्कार कार्यशाळेत ते ‘एआय आणि भविष्यातील विज्ञान’ या विषयावर बोलत होते. प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. मनीष सोनवणे, पर्यवेक्षक प्रा. पी. ए. अहिरे उपस्थित होते. डॉ. जोहरे म्हणाले, की एआय तंत्रज्ञान मानवाने विकसित केलेल्या अल्गोरिदम, डेटासेट आणि संगणकीय प्रणालींवर आधारित तंत्रज्ञान आहे. मोठ्या प्रमाणातील मानवी निर्मित माहितीतील नमुने ओळखून त्यावर आधारित अंदाज व उत्तर निर्माण करण्याचे काम एआय करते. त्यामुळे एआय मानवी ज्ञान व वर्तनातील नमुन्यांचे अनुकरण करते. ‘एआय’साठी मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स, संगणकीय चिप्स, नेटवर्किंग व्यवस्था, ऊर्जा व इंटरनेट पायाभूत सुविधा आवश्यक असतात. या भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती, देखभाल आणि विस्तार करण्यासाठी मानवी कौशल्य, उद्योग आणि संसाधनांची गरज असून, मानवी नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT