YCMOU Latest marathi news esakal
नाशिक

YCMOU News : मुक्‍त विद्यापीठ MBAला AICTEची मान्यता; 10 हजार विद्यार्थ्यांना घेता येणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत असलेल्‍या एमबीए शिक्षणक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांची मान्‍यता मिळाली आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी माहिती दिली आहे. दरवर्षी सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

कुलसचिव भटूप्रसाद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे या प्रसंगी उपस्थित होते. (AICTE Recognizes YCMOU Open University MBA 10 thousand students can take admission nashik news)

कुलगुरू डॉ. सोनवणे म्‍हणाले, की दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या या मान्यतेमुळे मुक्त विद्यापीठाच्या ‘एमबीए’ ला अधिक महत्त्व प्राप्त होऊन, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला प्रवेश घेता येणार आहे.

ही मान्यता आगामी पाच वर्षांसाठी आहे. मुक्त विद्यापीठातून एमबीए पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या मान्‍यतेमुळे भविष्यात नोकरी, व्यवसायात महत्त्व प्राप्त होणार आहे.

प्रवेश पात्रता परीक्षेची घोषणा लवकरच

शिक्षणक्रमासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्‍याकरिता प्रवेश पात्रता परीक्षेबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विविध विषयांसह ऑन जॉब ट्रेनिंग, फिल्ड प्रोजेक्ट, ओपन इलेक्टिव्हज ही एमबीएची वैशिष्ट्ये असतील. मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स आणि फायनान्स या तीन शाखांमध्ये शिक्षणक्रम उपलब्‍ध असेल, असे कुलगुरू डॉ.सोनवणे यांनी सांगितले आहे.

सकारात्मक प्रयत्नांना यश : डॉ. पाटोळे

या मान्‍यतेबाबत वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे म्‍हणाले, की मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला मान्यता मिळण्यासाठी कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू होते.

संबंधित विद्याशाखा तथा विद्यापीठ प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे ही मान्‍यता मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT