NCP Ajit Pawar  esakal
नाशिक

Nashik Ajit Pawar : अजित पवार आज दिंडोरीसह कळवण अन् नाशिक दौऱ्यावर; सायंकाळी कार्यकर्त्यांशी होणार संवाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता. ७) दिंडोरी, कळवण आणि नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनात सायंकाळी सहाला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

रात्री नऊला ओझरहून ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. या दौऱ्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ त्यांच्यासमवेत असतील. (Ajit Pawar on Kalwan and Nashik Dindori tour today nashik news)

पवार हे सकाळी नऊला विमानाने मुंबईहून ओझरकडे रवाना होतील. पावणेदहाला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर अवनखेड येथे भक्तनिवासाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे. दिंडोरी, लखमापूर फाटा, वणी चौफुली, नांदुरी येथे पवार यांचे स्वागत केले जाईल.

कळवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील. कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार त्यांचे स्वागत करतील.

साडेअकराला कळवणमधील नाकोडा रस्त्यावरील साई लॉन्सजवळ आमदार पवार यांच्याकडून होणाऱ्या शेतकरी व कृतज्ञता मेळाव्यास उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.

त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होईल. दुपारी तीनला कोऱ्हाटेच्या सह्याद्री ॲग्रो फार्म हाउसला ते भेट देतील. सह्याद्री फार्मसचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. नाशिकमधील कार्यकर्त्यांचा संवाद झाल्यावर माजी आमदार जयंतराव जाधव यांच्या निवासस्थानी तासभर राखीव असेल. साडेआठला ते ओझरकडे रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT