Ajit Pawar News
Ajit Pawar News esakal
नाशिक

Ajit Pawar News: कांदा खरेदी केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विधानसभा अधिवेशनात कांद्याला क्विंटलला हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली. सरकारने तीनशे रुपये जाहीर केले. आम्ही पुन्हा अनुदान वाढविण्याची मागणी केली आणि साडेतीनशे रुपये अनुदान केले.

ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे सरकारला त्या वेळी सांगितले. आम्ही वेगवेगळी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. आता खरेदी केंद्रच बंद असल्याचे समजले.

त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबद्दल आपण बोलणार आहोत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ३०) येथे सांगितले. (Ajit Pawar Will talk to Chief Minister eknath shinde about onion procurement center nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या अगोदर पत्रकारांशी ते बोलत होते. मध्यंतरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने काही शेतकऱ्यांना मदत पोचली नाही, तसेच हरभरा केंद्र आणखी सुरू करायला हवे, असे श्री. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, की उद्धव ठाकरेंची बाजू त्यांचे वकील न्यायालयात मांडतील.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या मताबद्दल राज्य सरकारने आत्मचिंतन करावे. संविधानात प्रत्येकाने जाती-धर्माचा आदर करावा, असे नमूद आहे.

सगळ्या मुख्यमंत्र्यांचा कालावधी पाहिल्यावर न्यायालयाने आजवर अकार्यक्षम असे म्हटलेले नाही, ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखावी.

‘मास्टर माइंड’ कोण याचा शोध घ्यावा. राष्ट्रपती राजवटीविषयी प्रदेशाध्यक्षांनी काही वक्तव्य केले असल्यास त्यांना विचारावे. त्यांना कुठून माहिती मिळाली हे मला माहिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT